News Flash

बिल चुकतं न करणारे सगळेच फुकटे नसतात, ‘त्या’ तरुणांचे पत्र वाचून हॉटेलमालकाची खात्री पटली

हा किस्सा व्हायरल झाला आहे

हॉटेलमध्ये बिलाचे पैसे चुकते न करणारे सगळेच काही फुकटे नसतात. पण, कधी कधी स्वानुभवावरुन आपण एखाद्याविषयी पटकन मत बनवतो आणि त्यावर काहीतरी शिक्कामोर्तब करून मोकळे होतो. पण, एखाद्याविषयी पटकन मत बनवण्याआधी व्हायरल होणारा हा किस्सा जरूर वाचा. किलिमांजारो येथील एक हॉटेलमधला हा व्हिडिओ आहे. तीन मुलं इथल्या एका हॉटेलमध्ये जेवून गेले. पण बिल चुकते करण्याएवढे पैसे मात्र त्यांच्याकडे नव्हते. तेव्हा एटीएम मशीनमधून पैसे काढून तुम्हाला देऊ अशा आश्वासनावर ते हॉटेलमधून निघाले. कित्येक तास, दिवस उलटले तरी हे तिघंही पैसे घेऊन आले नाहीत.

किलिमांजारो मिडलबोरॉग हॉटेलचे मालक अपोलो यांना हा वाईट अनुभव आला. तेव्हा हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांवर अजिबात विश्वास ठेवू नका, पैसे असेल तरच खायला द्या, पैसे आणून देतो असं सांगितल्यावर त्यांची एखादी वस्तू गहाण ठेवा. अशा एक न दोन अनेक सूचना त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्या. या वाईट अनुभवानंतर माणूसकी मुळात राहिलीच नाही असंच त्यांचं मत झालं. पण, आश्चर्य म्हणजे काही दिवसांत त्यांच्या हॉटेलमध्ये काही पैसे आणि एक पत्र आलं. जे तीन तरुण हॉटेलमध्ये बिलाचे पैसे चुकते न करता जेऊन गेले होते त्यांचं ते पत्र होतं.

टॉम, अॅलेक्स, हॅरी अशी या तीन तरुणांनी नावं होती. ‘आम्ही एटीएम मशीन्समधून पैसे काढले होते. पण, आमची ट्रेन थोड्याचवेळात सुटणार होती. ती शेवटची ट्रेन होती. जर बिलाचे पैसे द्यायला आम्ही आलो असतो. तर त्या दिवशी आम्हाला घरी जाता आले नसते. म्हणून आम्ही धावत पळत स्टेशन गाठण्याचा निर्णय घेतला. या सगळ्या गोंधळात तुमचे पैसे चुकते करणं राहून गेले. पण, आता बिलाचे पैसे तुम्हाला पाठवले आहेत. तेव्हा दिरंगाईबद्दल क्षमस्व’ असं त्यांनी पत्रात लिहिलं होतं. अत्यंत अनपेक्षितरित्या ग्राहकांकडून हे पत्र आणि पैसे आल्यामुळे अपोलोही भारावून गेले. त्यांनी आपल्या हॉटेलच्या फेसबुक पेजवर हा अनुभव शेअर केला. हॉटेलमधल्या अभिप्रायाच्या बोर्डवरही त्यांनी हे पत्र मोठ्या प्रेमानं लावून ठेवलं आहे. एखाद्याविषयी चटकन मत बनवण्याआधी हा भावस्पर्शी किस्सा जरूर वाचा अशी विनंती ते ग्राहकांना करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 2:51 pm

Web Title: restaurant owner received bill ammount and apology letter from person who walked out after meal
Next Stories
1 Viral : प्रसूतीपूर्वी रुग्णालयात दिली परीक्षा, महिलेचा फोटो व्हायरल
2 VIDEO : अमिताभ बच्चन यांनाही आवडली स्वीडन मेट्रो स्टेशनवरची ‘ही’ डोकॅलिटी
3 ‘मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी’साठी ग्राहकांना मोजावे लागणार फक्त */- रुपये
Just Now!
X