News Flash

दारुच्या बहाण्याने तब्बल 136 पुरूषांवर बलात्कार, कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

पुरुषांवर अत्याचार करुन सगळा प्रकार तो रेकॉर्डही करायचा

(छायाचित्र सौजन्य - फेसबुक)

ब्रिटनच्या मँचेस्टर क्राऊन कोर्टाने दीडशेहून अधिक लैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये दोषी रेयनहार्ड सिनागा या विकृताला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या खटल्याच्या वृत्तांकनासाठी माध्यमांवर टाकण्यात आलेले निर्बंध मँचेस्टर क्राऊन न्यायालयाने हटवल्यामुळे सिनागाची ओळख जगासमोर आली आहे. ब्रिटनच्या न्यायिक इतिहासातला सिनागा हा सगळ्यात कुख्यात गुन्हेगार असल्याचं ‘द क्राऊन प्रॉक्झिक्युशन सर्व्हिस’ने म्हटलं आहे. तर, सिनागाने तुरुंगात किमान 30 वर्षे व्यतीत करायला हवीत, 136 बलात्काराचे गुन्हे नावावर असलेल्या आरोपीची सुटका करणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नाही असे न्यायाधीशांनी शिक्षा सुनावताना म्हटले. सिनागा हा अतिशय क्रूर, हिंसक, धोकादायक आणि कारस्थानी माणूस आहे. त्याची सुटका करणं समाजातील अन्य व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नाही, असंही न्यायाधीश म्हणाले.

बीबीसीच्या वृत्तानुसार, 36 वर्षांचा सिनागा मँचेस्टर क्लबबाहेर पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढून आपल्या फ्लॅटवर नेत असे. तेथे त्यांच्यावर अत्याचार करुन सगळा प्रकार तो रेकॉर्ड करायचा. नाईटक्लब आणि बारमधून बाहेर पडणाऱ्या व्यक्तींना ड्रिंक घेऊया या बहाण्याने तो बरोबर नेत असे. ड्रगच्या माध्यमातून व्यक्तीला बेशुद्ध करून त्यांच्यावर अत्याचार करत असे. पीडित व्यक्तीला शुद्ध आल्यावर आपल्यासोबत काय झालं हे त्यांना आठवतही नसे. तर, सिनागाने हे आरोप नाकारले आहेत. सर्व लैंगिक संबंध सहमतीने झाल्याचं त्याचं म्हणणं आहे. प्रत्येक व्यक्तीने झोपलेलं असताना त्यांचं चित्रण करण्याची परवानगी दिली असं त्याचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे सिनागा हा लीड्स विद्यापीठात पीएचडी करत होता. गेले काही वर्षं तो लोकांचं अशा पद्धतीने शोषण करत होता. सिनागावरील हा खटला मँचेस्टर क्राऊन कोर्टात 18 महिने चालला.

चार विविध खटल्यांमध्ये सिनागा दोषी आढळलाय. बलात्काराच्या 136 खटल्यांमध्ये तो दोषी आढळला. बलात्काराचा प्रयत्न करण्याच्या 8 तर लैंगिक अत्याचाराच्या 14 गुन्ह्यांमध्ये तो दोषी आढळला. 48 पीडितांनी सिनागाविरुद्ध तक्रार नोंदवली होती. आणखी 70 पीडितांचा शोध घेता आलं नाही, असं तपासकर्त्यांनी सांगितलं. सिनागाने त्रास दिलेल्या व्यक्तींनी समोर यावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2020 9:25 am

Web Title: reynhard sinaga jailed for life for 136 rapes sas 89
Next Stories
1 #boycottchhapaak: दीपिकाविरोधात नेटकरी आक्रमक, चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी
2 VIDEO: पैठणी, मच्छीथाळी केक तुम्ही कधी पाहिलाय का? मुंबईच्या गृहिणीची कमाल
3 पहिल्या सामन्यात पावसाने खेळ केला, पण विराट कोहली ट्रोल झाला
Just Now!
X