27 September 2020

News Flash

2003 WC Final : पाँटींगने पोस्ट केला बॅटचा फोटो, भारतीयांनी विचारलं, यात स्प्रिंग होती ना??

पाहा नेटकऱ्यांचे भन्नाट रिप्लाय

दक्षिण आफ्रिकेत २००३ साली पार पडलेल्या वन-डे विश्वचषकाचा अंतिम सामना कोणताही भारतीय क्रिकेट प्रेमी विसरणार नाही. अंतिम फेरीत रिकी पाँटींगच्या ऑस्ट्रेलियन संघाने भारतावर दणदणीत विजय मिळवत विजेतेपद पटकावलं होतं. रिकी पाँटीगने अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांची धुलाई करत चौफेर फटकेबाजी केली होती. अपेक्षेप्रमाणे भारताला हे आव्हान पेलवता आलं नाही. मात्र या अंतिम सामन्यानंतर अनेक अफवांना पेव फुटलं होतं. या सर्व अफवांमध्ये रिकी पाँटीगच्या बॅटमध्ये स्प्रिंग होती आणि त्यामुळेच चेंडू इतक्या लांब जात होता अशी चर्चा सुरु होती.

रिकी पाँटीगने जुन्या आठवणींना उजाळा देताना, २००३ साली अंतिम सामन्यात वापरलेल्या बॅटचा फोटो पोस्ट केला.

मात्र भारतीय चाहत्यांनी या फोटोवर, आपली बऱ्याच वर्षांपासूनची शंका पाँटींगला विचारली…

अंतिम सामन्यात केवळ दोन बळी गमावत ऑस्ट्रेलियाने ३५९ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरादाखल भारताचे फलंदाज ४० षटकांत २३४ धावांपर्यंत मजल मारु शकले. साखळी फेरीपर्यंत चांगली कामगिरी करणारे भारतीय फलंदाज अंतिम सामन्यात पुरते अपयशी ठरले होते. यानंतर भारतीय संघाने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली २०११ साली मुंबईच्या वानखेडे मैदानावर विश्वचषक जिंकला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2020 6:54 pm

Web Title: ricky ponting shares photo of world cup 2003 final bat gets one query from indians psd 91
Next Stories
1 CoronaVirus : खेळाडूसह सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य विम्याचं संरक्षण, बंगाल क्रिकेट असोसिएशनचा निर्णय
2 CoronaVirus : परिस्थिती नियंत्रणात न आल्यास बीसीसीआय IPL रद्द करण्याच्या तयारीत??
3 CoronaVirus : आफ्रिदीची माणुसकी! गरीब व्यक्तींना देतोय मोफत अन्नधान्य
Just Now!
X