News Flash

CCTV : डिलिव्हरी बॉयला लुटण्यासाठी आले पण गळाभेट घेऊन गेले

'दयाळू चोर', व्हिडिओ पाहून तुम्हालाही नाही आवरणार हसू

CCTV : डिलिव्हरी बॉयला लुटण्यासाठी आले पण गळाभेट घेऊन गेले

पाकिस्तानमधला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल. डिलिव्हरी बॉयला लुटायला आलेल्या चोरांचं हृदय परिवर्तन होतं आणि ते लुटलेलं सामान त्याला परत देताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

पाकिस्तानच्या कराची शहरातली ही घटना असल्याचं सांगितलं जात आहे. पाकिस्तानच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार डिलिव्हरी बॉय बाइकवर बसण्याच्या तयारीत असतानाच मागून दुसऱ्या बाइकवर दोन व्यक्ती येतात. हे दोघं चोर डिलिव्हरी बॉयकडून पैसे, मोबाइल फोन आणि अन्य सामान चोरी करतात. चोरी झाल्यामुळे डिलिव्हरी बॉयला रडू कोसळतं. ते पाहून चोरी करायला आलेल्या चोरांना त्याची दया येते आणि ते चक्क चोरलेलं सर्व सामान त्याला परत करतात. इतकंच नाही तर जाताना त्याची गळाभेट घेऊन त्याला सांत्वना देताना हे चोर व्हिडिओमध्ये दिसत आहे.


सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून अनेक नेटकरी या ‘दयाळू चोरांचं’ कौतुक करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 11:23 am

Web Title: robbers in pakistan return valuables after victim breaks down viral video sas 89
Next Stories
1 “भारतीय रामाने चिनी ड्रॅगनला धडा शिकवला”; तैवानमध्ये व्हायरल होतोय फोटो
2 फ्लिपकार्टचं आता ‘हायपरलोकल डिलिव्हरी’ क्षेत्रात पाऊल; जाणून घ्या काय आहे ही सेवा?
3 जग चीनविरोधात असताना चिनी कंपन्या मात्र मालामाल, PUBG ने महिन्याभरात कमावले तब्बल १७१४ कोटी
Just Now!
X