23 November 2020

News Flash

आता रोबोटही करु शकणार अंत्यसंस्कार

जपानी कंपनीचे संशोधन

आपली दैनंदिन कामे करणारा, अगदी वेळप्रसंगी आपल्याशी खेळणारा रोबोट असतो हे आपल्याला माहितीये. पण व्यक्तीचे अंत्यसंस्कार करणाऱ्या रोबोटबद्दल तुम्ही कधी ऐकलंय? बहुदा नसेलच. पण नुकताच एका जपानी कंपनीने अशाप्रकारचा रोबोट तयार केला आहे. तंत्रज्ञानात वेगाने होणाऱ्या प्रगतीमुळे रोबोटच्या माध्यमातून कोणती कामे करता येतील सांगता येत नाही. त्यामुळे आता अंत्यसंस्काराचे कामही सोपे होणार आहे.

जपानमध्ये बुद्धीस्ट पद्धतीने अंत्यसंस्कार करणाऱ्या धर्मगुरुंना पिपर म्हणून ओळखले जाते. त्यांचे काम हा रोबोट करु शकेल असा कंपनीचा दावा आहे. कम्प्युटराईज पद्धतीने मंत्रपठण करणे आणि ड्रम वाजविण्याचे काम हा रोबोट करु शकणार आहे. टोकियोमध्ये नुकत्याच झालेल्या एका प्रदर्शनामध्ये हा रोबोट प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला होता.

सॉफ्टबॅंक ग्रुप कॉर्पोरेशनतर्फे २०१४मध्ये या रोबोटमधील तंत्रज्ञान तयार करण्यात आले होते. जपानमधील अनेक धर्मगुरुंना त्यांच्या समाजाकडून योग्य पद्धतीने अर्थिक सहाय्य करण्यात येत नाही. त्यामुळे अनेकजण त्यांच्या देवस्थानाबाहेर काम करतात. ज्यावेळी हे धर्मगुरु उपलब्ध होणार नाहीत. तेव्हा या रोबोटचा अतिशय चांगला फायदा होऊ शकतो.

या रोबोची किंमत जवळपास ३० हजार असून धर्मगुरु एका अंत्यविधीसाठी १ लाख ४० हजार रुपये घेतात. मात्र व्यक्तीला ज्याप्रमाणे हृदय असते आणि तो कोणतीही क्रिया हृदयातून करतो त्याप्रमाणे रोबोलो हृदय आहे का हे पाहण्यासाठी मी या प्रदर्शनाला आलो असल्याचे तेत्सुगी मात्सुओ या जपानी धर्मगुरुंनी सांगितले.  कोणताही धर्माचा योग्य तो पाया तयार करायचा असल्यास त्यासाठी हृदयाची आवश्यकता असते. आतापर्यंत या रोबोच्या साह्याने एकही अंत्यविधी करण्यात आला नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2017 5:28 pm

Web Title: robot will do funeral now in japan japanese company innovation
Next Stories
1 जाणून घ्या आतापर्यंतच्या १४ पंतप्रधानांचे शिक्षण
2 ऑफिसला जा… सायकलवरुन
3 आता व्हॉटस अॅपवरही व्हेरिफाईड अकाऊंटस ओळखण्याची सुविधा
Just Now!
X