मिशीगनमध्ये राहणारे एक गृहस्थ गेल्या काही वर्षांपासून एका दगडाचा वापर घराची पायरी म्हणून करत होते. पण, पायरी म्हणून आपण ज्या दगडसदृश्य वस्तूचा वापर करत आहोत ती काही साधीसुधी वस्तू नसून तिची किंमत लाखोंच्या घरात आले हे कळल्यावर या व्यक्तींचं आयुष्यच पूर्णपणे बदलून गेलं आहे. या व्यक्तीनं आपलं नाव आणि पत्ता पूर्णपणे गुपित राखला जावा अशी विनंती केली आहे. त्यामुळे या व्यक्तीचं नाव कळू शकलं नाही. मात्र हिच पायरी ओलांडून भारतीय मुल्याप्रमाणे जवळपास ७४ लाखांची लक्ष्मी त्याच्या घरी येणार आहे.

त्याचं झालं असं की काही वर्षांपूर्वी या व्यक्तीनं शेतातली एक दगडसदृश्य वस्तू स्वत:च्या घरी आणली होती. तिचा तो पायरी म्हणून उपयोग करायचा. मात्र काही वर्षांनी अशाच प्रकारचे लहान दगड विकून लोकांनी पैसे कमावल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानं हा दगड earth and atmospheric sciences सेंटरच्या एका प्राध्यपकला दाखवला. तेव्हा हा दगड नसून तो उल्कापिंड असल्याचं त्यांनी सांगितलं. उल्का वर्षाव म्हणजे आकाशातून अनेक उल्का पृथ्वीवर पडतात. या उल्का म्हणजे तुटणारे तारेच असतात. या खाली पडत असताना त्यांचा जो अंश पृथ्वीवर पडतो त्याला उल्कापिंड असं म्हणतात.

साधरण ७० वर्षांपूर्वी झालेल्या उल्कावर्षावत हे उल्कापिंड त्यांच्या शेतजमीनीत पडलं असण्याची शक्यता आहे. या उल्कापिंडची अजूनही विक्री झालेली नाही मात्र त्याची सध्याच्या घडीला तिची किंमत ही ७४ लाखांहून अधिक आहे. या उल्कापिंडासाठी आता बोली लावण्यास सुरूवात झाली आहे.