27 November 2020

News Flash

ब्रिटनच्या राजघराण्यात जन्मलेल्या नव्या पाहुण्याचं नाव ऐकलं का?

ब्रिटीश बुकमेकर्सतर्फे अल्बर्ट, आर्थर, फ्रेडरिक, जेम्स आणि फिलीप या नावांना पसंती देऊनही राजघराण्याने ज्या नावाला पसंती दिली ते अनेकांसाठी अनपेक्षित होतं.

छाया सौजन्य- AP

ब्रिटनच्या राजघराण्यात केट मिडलटन आणि प्रिंस विलियम यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन झाल्यानंतर सर्वत्रच आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. या नव्या पाहुण्याच्या जन्मानंतर बरेच शिष्टाचार पाळण्यात आले. ज्यानंतर आता त्या चिमुरड्याचं नामकरण करत त्याला नवी ओळख देण्यात आली आहे. लुईस आर्थर चार्ल्स असं या बाळाचं नाव ठेवण्यात आलं असून, केनसिंगटन पॅलेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन याविषयीची घोषणा करण्यात आली. त्यासोबतच तो ‘रॉयल हायनेस प्रिंस लुईस ऑफ केंब्रिज’ म्हणून ओळखला जाईल असंही जाहीर करण्यात आलं.

केट आणि प्रिंस विलियमचं हे तिसरं अपत्य आहे. नवजात शिशू हा राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा सहावा पणतू असून, राजघराण्याचा पाचवा वारस आहे. त्याच्या जन्मानंतर सोशल मीडियावर त्याचं नाव नेमकं काय ठेवणार याविषयी बरीच चर्चा पाहायला मिळाली होती. अनेकांनीच या बाळाच्या नावाविषयी तर्क लावण्यासही सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. पण, राजघराण्यात जन्मलेल्या या बाळाचं नव जाहीर करताच हे तर्क लावणं थांबलं आणि ट्रेंडमध्ये आलं ते म्हणजे लुईस आर्थर चार्ल्सचं नाव. मुख्य म्हणजे ‘लुईस’ हे नाव अनेकांसाठी अनपेक्षित होतं. कारण, या बाळाच्या जन्मानंतरच ब्रिटनमध्ये आणि इतरही बऱ्याच ठिकाणी त्याच्या नावारुन बेटींग करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. ज्यामध्ये ब्रिटीश बुकमेकर्सतर्फे अल्बर्ट, आर्थर, फ्रेडरिक, जेम्स आणि फिलीप या नावांना पसंती देण्यास आली होती.

वाचा : जेव्हा चहा विक्रेत्याने पहिल्यांदाच आपल्या मुलांना नेलं मॅकडोनल्डमध्ये

गुगल ट्रेंडच्या ट्विटर अकाऊंटवरुनही याविषयीची माहीती देण्यात आली होती. लुईसच्या नावाचा अर्थ काय? हे राजघराण्यातीलच नाव आहे का? किती फ्रेंच राजांची नावं लुईल होती? लुईस हे फ्रेंच नाव आहे का, असे विविध प्रश्न विचारत अनेकांनीच गुगलवर आपल्या शंकांचं निरसन केल्याचं पाहायला मिळालं. तर काहींनी राजघराण्यात सुरु असणारी नावांची परंपरा आताही पुढे कायम ठेवण्यात आली आहे, असं म्हटलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 1:39 pm

Web Title: royal baby prince louis arthur charles newborn princes name leaves one direction fans overjoyed kate middleton and prince william
Next Stories
1 जोडप्याला ‘कन्यारत्ना’ची प्रतीक्षा, पण चौदावं अपत्यही मुलगाच
2 स्टेडियममध्ये वर्षभराची बंदी, सामना पाहण्यासाठी त्यानं चक्क भाड्यानं क्रेन घेतली!
3 VIDEO …जेव्हा साधूचा वेश धारण करुन ब्रेट ली मुंबईतील मुलांबरोबर क्रिकेट खेळतो!
Just Now!
X