News Flash

एका विद्यार्थासाठी सरकारने कोट्यवधी खर्चून उभारली शाळा

प्रत्येकाचा सर्वांगीण विकास हा शिक्षणावरच अवलंबून असतो.

(संग्रहित छायाचित्र)

प्रत्येकाचा सर्वांगीण विकास हा शिक्षणावरच अवलंबून असतो. त्यासाठी प्रत्येक देश आपल्या देशाच्या उज्जवल भविष्यासाठी शिक्षणावर कोट्यवधी रूपये खर्च करतो. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे व्योमिंगमधील लारामी शहरात पाहायला मिळतेय. येथील सरकारने फक्त एका मुलाला शिकविण्यासाठी तब्बल एक कोटी रुपये खर्च करून एक शाळा सुरू केली आहे.

येथे केवळ एका मुलाला शिकविण्यासाठी शाळा सुरू करण्यामागचं कारण, या परिसराचा मोठा भाग डोंगराळ आहे. शिवाय व्योमिंगच्या कायद्यानुसार, रहिवासी परिसरापासून दूर राहणाऱ्या लहान मुलांना जास्त लांब असलेल्या शाळांमध्ये प्रवेशच दिला जात नाही. डोंगराळ भाग असल्यामुळे येथील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. त्यामुळे फक्त एका मुलासाठी कोट्यवधी रूपयांचा खर्च करून शाळा सुरू केली आहे.

खराब रस्ते व डोंगराळ प्रदेशामुळे या मुलाला शाळेत जाणे आणि माघारी येणं अत्यंत कठीण जाते. तसेच व्योमिंगच्या कायद्यानुसार शालेय परिसरापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जात नाही. शेवटी यावर पर्याय म्हणून सरकारने केवळ एका मुलासाठी ही शाळा सुरु केली आहे. या मुलाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिकवले जाते.

याआधीही १५ वर्षापूर्वी २००४मध्ये अशीच एक केवळ एका विद्यार्थासाठी शाळा सुरु करण्यात आली होती. मात्र, काही तांत्रीक अडचणीमुळे शाळा पूर्णपणे बंद करण्यात आली. २००४ मध्ये येथील शाळेत २०४ विद्यार्थी शिक्षण घेत होते. त्यांच्यासाठी सरकारने ही शाळा बांधली होती. आता फक्त एका विद्यार्थामुळे सरकारने कोट्यवधींचा खर्च करून शाळा उभारली आहे. ज्या देशांमध्ये शिक्षणाची समस्या आहे, परिस्थिती अभावी म्हणा किंवा इतर कारणामुळे शिक्षणापासून मुले वंचित राहिली आहेत. अशा देशांसाठी व्योमिंगमधील लारामी शहरातील शाळा आदर्श ठरत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 6:44 pm

Web Title: rural school district in wyoming to open a 1 student schoolhouse
Next Stories
1 …म्हणून होळीच्या दिवशी या गावांमध्ये पाळला जातो दुखवटा
2 आज दिवस आणि रात्र असतील समान
3 शांततेच्या नोबेलसाठी १६ वर्षीय मुलीचे नामांकन
Just Now!
X