रशियातल्या एका टॉप मॉडेलला फोटोशूटसाठी चक्क कच्च्या मांसापासून बनवलेले कपडे घालायला लावले. या फोटोशूटचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सेंट पिटर्सबर्ग येथे राहणारी यूलिया कॉनेवा ही रशियातील प्रसिद्ध मॉडेल्सपैकी एक आहे. सोशल मीडियावर ती बरीच अॅक्टीव्ह असते. यूलियाचा चाहता वर्गही मोठा आहे. इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे फॉलोवर्सही अधिक आहे. यूलियाने नुकतेच ‘मॅग्जिम इंटरनॅशनल’ या पुरुषांच्या मासिकासाठी हे शूट केले होते. या मासिकासाठी तिने चक्क कच्च्या मांसापासून बनवलेले कपडे परिधान केले आहेत.
फॅशन डिझानर नातल्या फदिवा हिने हा ड्रेस तयार केला आहे. हा ड्रेस परिधान करायला यूलियाला किमान एक तास तरी लागला. हा ड्रेस घालून ती जवळपास ४ तास फोटो शूट करत होती. फोटोशूट संपल्यानंतर युलियाने आपली प्रतिक्रिया दिली. ‘कच्चा मांसापासून बनवलेला ड्रेस घालून वावरणे हे मी केलेले आतापर्यंतचे सगळ्यात कठीण काम होते’. ‘फोटोशूटला सुरूवात झाल्यानंतर काही वेळाने या मांसापासून दुर्गंधी यायला सुरूवात झाली पण तशातही आपण शूट केले. शूट संपल्यानंतर कित्येक तास आपल्या शरीराला मांसाची दुर्गंधी येत असल्याचे तिने सांगितले. यापूर्वी पॉप सिंगर लेडी गागा हिनेही असाच ड्रेस परिधान केला होता. एका कार्यक्रमात हा ड्रेस परिधान करून आल्यानंतर अनेक प्राणीप्रेमी संघटनांनी लेडी गागावर आक्षेप घेतला होता.