17 January 2019

News Flash

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडे स्मार्टफोन नाही

एका मुलाखतीत त्यांनी स्मार्टफोन वापरत नसल्याचं कबुल केलं

स्मार्टफोनचा जमाना आहे. स्मार्टफोनशिवाय अनेकांचा दिवसच जाऊ शकत नाही. स्मार्टफोनच्या आहारी गेलेले असे कोट्यवधी लोक जगात आहे. एकीकडे स्मार्टफोनशिवाय राहण्याची कल्पनाच लोकांना असहय्य होत आहे तर दुसरीकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन मात्र आपण स्मार्टफोन वापरत नसल्याचं ठामपणे जगाला सांगत आहे. नुकताच त्यांना स्मार्टफोनवरून प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी भलेही जग स्मार्टफोन वापरत असेल पण माझ्याकडे मात्र स्मार्टफोन नाही किंवा मी स्मार्टफोन वापरतच नाही असं सांगून त्यांनी सगळ्यांनाच आश्चर्यचकीत केले आहे.

आपण तंत्रज्ञानाच्या बाबतीत फारसे सरसावलो नसल्याचंही त्यांनी कबुल केलं. २००५ पर्यंत आपल्याजवळ मोबाईल फोन नव्हता असंही पुतिन म्हणाले. गेल्यावर्षी पुतिन यांनी शालेय विद्यार्थ्यांशी भेट घेतली होती. त्यावेळी आपण कमीत कमी इंटरनेटचा वापर करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. इन्स्टाग्रामवर तुम्ही सक्रीय असता का? असा प्रश्न त्यांना काही विद्यार्थ्यांनी विचारला होता त्यावेळी मी दिवसभर काम करतो त्यामुळे मला या सर्व गोष्टींसाठी वेळ नाही विद्यार्थ्यांना सांगितलं होतं.

First Published on February 9, 2018 6:43 pm

Web Title: russian president vladimir putin does not have a smartphone