गेल्या आठवड्याभरापासून राज्यभरात थंडीनं मुक्काम ठोकला आहे. मुंबईत तर पारा १३ अंश से.पर्यंत खाली आला आहे, त्यामुळे थंडीनं सगळेच गारठले आहेत, पण हाडं गोठवणारी खरी थंडी काय असते हे पाहायचं आहे तर रशियाच्या या गावाबद्दल जरुर वाचा. या गावात थंडीत तापमान उणे ७० अंशाच्याही खाली जातं. हा आकडा वाचून तुम्ही इथल्या तापमानाबद्दलची कल्पना करू शकता.

या गावाचं नाव ओयमियाकन आहे. येथे फक्त ५०० लोक राहतात. या गावातील अनेक लोक भटक्या जमातीतील आहेत, कडाक्याची थंडी आणि दळणवळणाच्या अत्यल्प सुविधा यामुळे या गावाचा शहरांशी संपर्क तुटला आहे. इथे फोनही काम करत नाही. आश्चर्य म्हणजे या गावात १ शाळादेखील आहे. जी हाडं गोठवणारी थंडी असली तरी सुरुच असते. जेव्हा तापमान ५० अंश सेल्शिअसच्याही खाली उतरते त्याचवेळी ही शाळा काही दिवसांसाठी बंद करण्यात येते.

Another 18-hour power cut in Ghansoli village
घणसोली गावात पुन्हा १८ तास वीजविघ्न
Pune records highest temperature in April in eleven years
पुण्यात अकरा वर्षांतील एप्रिलमधील सर्वाधिक तापमानाची नोंद; तापमानाचा आलेख कसा चढा राहिला?
rain Mumbai,
मुंबईसह ठाण्यात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता
Nashik heats up temperature at 40.4 degree Celsius but sprinkles of rain in some areas
नाशिक तापले… पारा ४०.४ अंशावर, काही भागात पावसाचा शिडकावा

अतिशय थंड हवामान असल्यानं इथे काहीच पिकत नाही. गावकरी रेनडिअर पाळतात आणि त्याचे मांस खाऊन आपले पोट भरतात. रेनडिअरच्या मांसाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारचं अन्न इथे मिळणं तसं दुर्मिळच. या गावात फक्त एकच दुकान आहे जिथे जीवनावश्यक वस्तू मिळतात. या गावात एकच पेट्रोलपंप आहे. दुसरं आश्चर्य म्हणजे येथे लोक आपली गाडी २४ तास सुरूच ठेवतात. कमी तापमानामुळे गाडी बंद पडली तर सुरू होणार नाही या भीतीने ते गाडी बंदच करत नाही.