चक्क क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर गुरूवारी राज्यसभेत आल्याने अनेकांना धक्काच बसला. दोन दिवसांपूर्वीच समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी सभागृहातील सचिन आणि रेखाच्याा अनुपस्थितीचा मुद्दा उपस्थित केला होता. कला आणि क्रीडा या विभागातून नामवंत व्यक्तींना खासदार म्हणून राज्यसभेवर पाठवलं जातं. पण सचिन मात्र खासदारकी मिळूनही राजकारणापासून काही हात लाबंच राहिला. तेव्हा सचिनला जर राज्यसभेत यायचं नाही तर त्यांनी सरळ खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी अग्रवाल यांनी केली होती. इतकंच नाही तर त्याला जाहिराती करण्यासाठी आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी वेळ आहे मग राज्यसभेत का गैरहजर राहतात असा बोचरा सवाल त्यांनी केला होता. ही बोचरी टीका सचिनच्या जिव्हारी अशी लागली की गुरूवारी राज्यसभेत त्याने उपस्थिती लावली.

मास्टर ब्लास्टर सचिन बराच वेळ सभागृहातील चर्चा ऐकत बसला होता होता. तेव्हा राज्यसभेतला सचिनच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटीझन्सने हा फोटो ट्विट करत यावर एकपेक्षा ऐक ओळी लिहिल्या आहे. सचिन म्हणजे ‘ईदचा चंद्र आहे, पार वाट पाहायला लावतो आणि क्वचितच दिसतो’ असं म्हणत या फोटोवर एकापेक्षा एक जोक्स व्हायरल होत आहेत.