News Flash

VIDEO : मित्रांना बार्बेक्यू ट्रिट देत शेफ सचिनने मारला मास्टर स्ट्रोक

मित्रांसाठी आखला बार्बेक्यूचा बेत

सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर जसा क्रिकेटमध्ये खराखुरा हिरा आहे, तसाच तो अस्सल खवय्याही आहे. क्रिकेटच्या मैदानावर दमदार बॅटिंग करणारा सचिन खाण्याच्या टेबलावरही तितकीच जोरदार खवय्येगिरी करतो. त्याच्या खवय्येगिरीचे आणि मित्रांसोबतच्या मस्तीचे बरेच किस्से ऐकायला मिळतात. लहानपणापासूनच खाण्याचा शौकीन असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिनला मित्रांनाही खाऊ घालायला प्रचंड आवडतं. याच गोष्टीची प्रचिती पुन्हा एकदा आली. थर्टी फर्स्टच्या पार्टीचा एक व्हिडिओ त्याने ट्विटरवर पोस्ट केला असून सोशल मीडियावर तो तुफान व्हायरल होत आहे.

थर्टी फर्स्टच्या संध्याकाळी त्याने मित्रांसाठी बार्बेक्यूचा बेत आखला आणि स्वत: शेफ होऊन सचिनने चिकन बनवले. न्यू इयर स्पेशल बार्बेक्यू चिकन त्याने मित्रांना खाऊ घातले. ‘नववर्षाच्या पूर्वसंध्येला मित्रांसाठी जेवण बनवताना मला फार आनंद झाला. त्यांना ते फार आवडलं असून त्यांच्या जीभेवर अजूनही बार्बेक्यूची चव रेंगाळत आहे,’ असं म्हणत सचिनने चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. शेफ सचिनचा हा मास्टर स्ट्रोक चाहत्यांना फारच आवडला असून या व्हिडिओला भरभरून लाइक्स मिळत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2018 2:19 pm

Web Title: sachin tendulkar cook for his friends on new years eve watch this video
Next Stories
1 Viral : प्रेरणादायी मलाला, २०१७ मधील तिचा प्रवास
2 Viral Video : सानिया मिर्झाचा ‘तो’ डान्स व्हायरल
3 आनंद महिंद्रा रस्त्यावरच्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलमध्ये गुंतवणूक करणार?
Just Now!
X