12 August 2020

News Flash

मुंबईच्या पावसाने दिला सचिनच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा

सारा तेंडुलकरने शूट केला बाबांचा Video

पावसाळा हा ऋतू बहुतांश लोकांना आवडतो. मुंबईचा पाऊस हा तर जणू काही एखाद्या सणासारखाच असतो. या पावसात भिजण्याची संधी मुंबईकर सहसा सोडत नाही. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरदेखील याला अपवाद नाही. सचिनने बुधवारी आपल्या मुंबईच्या घराच्या खुल्या परिसरात पावसात भिजण्याचा आनंद लुटला. पावसात भिजताना बालपणीच्या आठवणींना पुन्हा एकदा नव्याने उजाळा दिल्याचे सचिनने म्हंटले. सचिनची लेक सारा हिने तो पावसात भिजत असताना त्याचा व्हिडीओ तयार केला. सचिनने हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आहे. “माझी सर्वात आवडती फोटोग्राफर असलेल्या साराने हा व्हिडीओ शूट केला असून मी पावसाचा आनंद लुटत आहे. पावसाचे थेंब कायमच लहानपण परत आणणात”, असं सचिनने त्या व्हिडिओला कॅप्शन देखील दिलं आहे.

लॉकडाउन काळात सचिन स्वतःला घरकामात व्यस्त ठेवताना अनेकदा दिसला. घरच्या घरी स्वतःचे आणि मुलाचे केस कापण्याचे कामही त्याने छान केले. तसेच लॉकडाउनच्या अटी शिथिल झाल्यानंतर सचिनने टेनिस खेळण्याचादेखील आनंद लुटला.

करोना विषाणूमुळे गेले ३ महिने देशभरात सारं काही ठप्प होतं. पण आता हळूहळू परिस्थिती सुधारताना दिसते आहे. पण भारतीय खेळांच्या बाबतीत अजूनही सारे शांत आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गेल्या आठवड्यात सुरुवात झाली आहे. इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटी क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा करोनानंतर श्रीगणेशा केला. पण भारतात क्रिकेट सुरू होण्यासाठी अजून काही वेळ वाट पाहावी लागणार असल्याचे दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 8:57 am

Web Title: sachin tendulkar daughter sara captures him enjoying mumbai rains vjb 91
Next Stories
1 007 ! दिल्लीच्या व्यक्तीने स्वत:चं नावच बदललं, पत्नीला जेव्हा ‘जेम्स बॉण्ड’च्या कारनाम्यांबद्दल कळलं…
2 “मला केमिस्ट्रीत २४ मार्क होते मात्र..”; IAS अधिकाऱ्याने विद्यार्थ्यांसाठी शेअर केला स्वत:चा बारावीचा निकाल
3 ऐकावं ते नवलच : सीबीएसई १२ वीच्या परीक्षेत जुळ्या बहिणींना मिळालेले गुण वाचून व्हाल थक्क
Just Now!
X