News Flash

Video : लग्नाचा पंचविसावा वाढदिवस ! बायकोला खुश करण्यासाठी सचिनने बनवली आंबा कुल्फी

सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

काल सचिन तेंडुलकरच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस होता. सचिनने पत्नी अंजली आणि कुटुंबीयांसाठी खास आंबा कुल्फी बनवून आपला २५ वा वाढदिवस साजरा केला

प्रत्येक विवाहीत जोडप्यासाठी आपल्या लग्नाचा २५ वा वाढदिवस हा खास मानला जातो. भारतीय संघाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर आज आपल्या लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा करतो आहे. सध्याच्या लॉकडाउन काळात नेहमीसारखं सेलिब्रेशन करता आलेलं नसलं, तरीही आपली पत्नी अंजली व घरातील इतरांना खुश करण्यासाठी सचिनने आज खास बेत आखला होता.

सध्या आंब्यांचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे सचिनने एका खास पद्धतीने आंबा कुल्फी तयार केली. आपल्या या खास रेसिपीचा व्हिडीओ सचिनने सोशल मीडियावर शेअर केला आहे. पाहा मग, कशी बनवली आहे सचिनने आंबा कुल्फी…

क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर सचिनने अधेमधे किचनमध्ये आपली कला आजमावत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या आईसाठी खास वांग्याचं भरीत बनवलेलं होतं. सध्या करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतही सचिनने सक्रीय सहभाग नोंदवला आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्यापासून ते अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांच्या स्वच्छताविषयक अभियानात तो सहभागी झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2020 7:54 pm

Web Title: sachin tendulkar made special mango kulfi to celebrate his 25th wedding anniversary psd 91
Next Stories
1 लॉकडाउन वाढवणं आर्थिक दृष्टीने अनर्थकारी ठरेल – आनंद महिंद्रा
2 Viral Video: जंगलातील थरार कॅमेऱ्यात कैद; चित्ता वेगाने पाठलाग करताना वापरतो ‘ही’ शक्कल
3 Viral video: कावळ्याची कमाल! अडकलेल्या प्राण्याला रस्ता ओलांडण्यास केली मदत
Just Now!
X