News Flash

वाघोबाला पाहण्यासाठी ‘क्रिकेटचा देव’ ताडोबाच्या जंगलात

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

आपल्या धडाकेबाज फलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांच्या मनात धडकी भरवणारा भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर, आजही चाहत्यांच्या मनात आपलं घर करुन आहे. काही दिवसांपूर्वी, सचिनने ताडोबा येथील व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. त्याच्या या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सचिनचं स्वागत करताना ताडोबा व्याघ्रप्रकल्पाचे वनाधिकारी

 

सचिनच्या या तोडाबा भेटीसंदर्भात कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. चिमुर तालुक्यातील कोलारा गेट परिसरातून सचिनने ताडोबामध्ये प्रवेश केला. प्रशासनाने सचिनच्या या भेटीबद्दल कितीही गुप्तता पाळली तरीही, काही पर्यटकांनी सचिनला पाहण्यासाठी गर्दी केली. मात्र सचिनने थेट सफारीवर जाणं पसंत केल्यामुळे यावेळी चाहत्यांचा भ्रमनिरास झाला. खासदार क्रीडा महोत्सवाकरता सचिन नागपुरला आलेला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 7:53 pm

Web Title: sachin tendulkar visit tadoba tiger sanctuary pictures goes viral on social media psd 91
टॅग : Sachin Tendulkar
Next Stories
1 वायरशिवाय चार्ज होणार OnePlus 8 Pro !
2 Huawei Band 4 भारतात लाँच; किंमत 1,999 रुपये
3 रतन टाटा यांनी पोस्ट केला तरुणपणीचा फोटो, नेटकऱ्यांचा बसेना विश्वास
Just Now!
X