मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची BMW विकत घेण्याची संधी तुम्हाला आली आहे. cartoq.com च्या एका रिपोर्टनुसार, सचिनने २००२ मध्ये खरेदी केलेली निळ्या रंगाची BMW X5 कार लिलावात उपलबद्ध आहे. ही कार चौथ्या वेळी विकली जातेय. सचिनने २००२ मध्ये BMW X5 खरेदी केली होती. त्यानंतर काही दिवसांनंतर सचिनने BMW कार विकली होती. त्यानंतर ती आतापर्यंत तीन वेळा विकली गेली होती. सचिनची ही BMW X5 आता चौथ्यांदा लिलावत विक्रीसाठी आली आहे.

वेबसाईटवर असेलेल्या एका जाहिरातीनुसार भारतामध्ये दुर्मीळ असणाऱ्या निळ्या रंगाच्या या BMW X5 ची किंमत २१ लाख रूपये ठेवण्यात आली आहे. आतापर्यंत ही कार ७२ हजार किलोमीटर धावली आहे तर इंजिन बुलेटप्रुफ मॅटिरिअलने तयार झालेले आहे.

BMW X5M एसयूव्ही मध्ये 4.6S किंव्हा ४,६१९ सीसीचे व्ही ८ पेट्रोल इंजिन आहे. सात सेकंदामध्ये BMW X5 ही गाडी १०० किलोमीटर धावू शकते. पाच ऑटोमॅटीक गिअर वाली BMW X5 ताशी २३९ किलीमीटरने धावते. जर तुम्हाला सचिन तेंडुलकरने वापरलेली BMW X5 ही कार खऱेदी करायची असल्यास Acierto Multi trade PVT. Limited यांच्याशी संपर्क करा.