विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात वन-डे मालिका खेळतो आहे. सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांची ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी धुलाई केली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या मालिकेसाठी मैदानात ठराविक प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. दुसऱ्या वन-डे सामन्यात भारतीय खेळाडूंना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भारतीय प्रेक्षकांनी हजेरी लावली होती.
या सर्व प्रेक्षकांमध्ये एका मराठमोळ्या प्रेक्षकांना छत्रपती शिवाजी महाराज यांची ओळख असलेला भगवा झेंडा झळकावत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील सिडनी येथील दुसऱ्या वन-डे सामन्यादरम्यान प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या एका मराठमोळ्या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाणता राजा असा भगवा झेंडा ऑस्ट्रेलियात फडकावला. #INDvAUS #indvsaus2020
व्हिडीओ सौजन्य – विनीता चव्हाण आणि तुषार पवार pic.twitter.com/jHkwpF2s0X— LoksattaLive (@LoksattaLive) November 29, 2020
दरम्यान दुसऱ्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथने शतक झळकावत भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. त्याला डेव्हिड वॉर्नर, फिंच, मॅक्सवेल, लाबुशेन यांनी अर्धशतकं झळकावत चांगली साथ दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2020 1:52 pm