मध्य प्रदेशमधील भोपाळमधला एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. यात एक सर्पप्रेमी पोत्यातून दहा वीस नाही तर तब्बल २८५ साप भरुन आणतो आणि हाताने या सापांना बाजूला करून त्यांना जंगलात सोडून देतो.
सलेम खान हे गेल्या कित्येक वर्षांपासून सापांना पकडण्याचे काम करत आहेत. सापांना पकडून त्यांना सुरक्षित जंगलात सोडण्याचे काम सलीम करतात. या व्हिडिओमध्ये देखील ते हेच काम करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पंचमाडी जंगलातला आहे. सलेम हे पोत्यातून जवळपास २८५ साप घेऊन येतात. पोत्यात राहिल्याने हे साप एकमेकांत गुंततात. सलेम मात्र अजिबात न घाबरता या सापांचा गुंता सोडवता आणि काही सेंकदाच्या आतच हे साप जंगलात कुठेतरी गायब होतात. यातला एकही साप सलेम यांना चावला असता तर त्यांच्या जीवाशी बेतले असते पण सलेम यांना मात्र हे काम करताना कोणतीही भिती वाटली नाही. अनेक वर्षांपासून सापांना पकडण्याचे काम सलेम करत असल्याने त्यांना सापाची अधिक माहिती आहे.
सलेम हे सापांना वाचवतात आणि त्यांना आपल्या घरात सुरक्षित ठेवतात. योग्य वेळ आली की ते सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या जंगलात या सापांना सोडून देतात. सापांना सोडून दिल्यानंतर ते प्रार्थना देखील करतात. दरवर्षी विविध भागांतून वाचवलेल्या सापांना घेऊन ते सातपुडच्या जंगलात जातात.