विश्वचषक स्पर्धेमधील सर्वात महत्वाच्या सामन्यांपैकी एक असणारा भारत पाकिस्तानमधील सामना रविवारी मँचेस्टरच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यामध्ये भारताने शानदार विजय मिळवत विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानवर मात करण्याची परंपरा कायम राखली. या सामन्यामध्ये भारतीय संघाने आणि खेळाडूंने अनेक विक्रमांना गवसणी घातली. या सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तानचे चाहते चांगले संतापले असून सततच्या पराभवामुळे त्यांनी आपल्या टीमला लक्ष्य केले आहे. या संतापलेल्या पाकिस्तानी चाहत्यांनी आता भारतीय संघाविरुद्धाच्या सामन्याच्या आदल्या रात्री पाकिस्तानी संघ हुक्का पार्लरमध्ये पार्टी करत असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भातील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा तिचा पती शोएब मलिक सोबत हुक्का पार्लरमध्ये हुक्का पिताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ व्हायरल झाला असून अनेकांनी पाकिस्तानी खेळाडूंच्या बेजबाबदार वागण्याबद्दल टिका केली आहे.

सामन्यातील पराभवानंतर हे ट्विट व्हायरल झाले. आधीच पराभवाने संतापलेल्या पाकिस्तानी चाहत्यांनी या व्हिडिओवरुन संघातील खेळाडूंना चांगलेच खडेबोल सुनावले. अनेकजणांनी या फोटोंवर कमेंट करुन सानिया मिर्झाला ट्रोल केले आहे. पाकिस्तानच्या पराभवासाठी सानियाचा मोलाचा वाटा असल्याचा टोला नेटकऱ्यांनी लगावला आहे. भारतीयांनी सानियाला धन्यवाद वहिनी असं म्हटलं आहे तर पाकिस्तानी चाहत्यांनी तिला एजंट म्हटले आहे.

नक्की वाचा >> Ind vs Pak सामन्याच्या आदल्या रात्री हुक्का पार्लरमध्ये पार्टी करत होते पाकिस्तानी खेळाडू

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

११)

१२)

 

१३)

याशिवाय भारताविरुद्धच्या सामन्यामध्ये पहिल्याच चेंडूवर बाद झालेल्या शोएब मलिकला नेटकऱ्यांनी ट्रोल केले.

१)

२)

३)

४)

५)

६)

दरम्यान शोएब मलिकनेही ट्विट करुन या व्हिडिओसंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. हा व्हिडिओ १५ तारखेचा नसून १३ तारखेचा असल्याचे म्हटले आहे.