News Flash

कृपा करा, प्रशिक्षकासाठी अर्ज करु नका ! जसप्रीत बुमराहला सल्ला देणारे संजय मांजरेकर ट्रोल

तिसऱ्या सामन्यात बुमराहची खराब कामगिरी

न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने सुपरओव्हरवर बाजी मारली. मात्र या सामन्यात जसप्रीत बुमराह आपल्या नेहमीच्या फॉर्मात दिसला नाही. तिसऱ्या टी-२० सामन्यात बुमराहने एकही बळी न घेता ४५ धावा दिल्या. यानंतर सुपरओव्हरमध्येही बुमराहच्या षटकावर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी १७ धावा कुटल्या.

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी सामना संपल्यानंतर आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन, जसप्रीत बुमराहाला गोलंदाजीविषयी सूचना केली.

मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानल्या जाणाऱ्या बुमराहला सल्ला देणं मांजरेकरांना चांगलंच महागात पडलं. नेटकऱ्यांनी संजय मांजरेकरांना ट्रोल करत त्यांची खिल्ली उडवली आहे.

दरम्यान न्यूझीलंडच्या धरतीवर भारतीय संघाने टी-२० मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. टी-२० मालिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये ३ वन-डे आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे या मालिकेत न्यूझीलंडचा संघ कसं पुनरागमन करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 10:16 am

Web Title: sanjay manjrekar becomes butt of jokes on twitter for giving bowling tips to jasprit bumrah psd 91
Next Stories
1 सुपरओव्हरवर बंदी घाला, भारताच्या विजयानंतर क्रीडामंत्र्यांची अजब मागणी
2 IND vs NZ: चौथ्या सामन्याआधी मोहम्मद शामीने मुलीसाठी लिहिला खास संदेश
3 एकता कपूरला पद्मश्री मिळतो, मग बाबांना का नाही? खाशाबा जाधवांच्या मुलाचा उद्वीग्न सवाल
Just Now!
X