News Flash

पुरुष आणि फोटोग्राफीला बंदी, कट्टर मुस्लिमबहुल देशात पहिल्यांदा होणार फॅशन शो

फॅशन शोच्या दरम्यान छायाचित्रिकरणावरही पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. फॅशन शोमध्ये महिला आयबा परिधान न करताच रम्पवॉक करणार आहे.

गेल्याकाही दिवसांपासून फॅशन शो होणार याच्या चर्चा होत्या. पण काही कारणानं दोनदा हा कार्यक्रम पुढे ढकलला.

सौदी अरेबिया हा जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक देश असला तरी कित्येक बाबतीत हा देश मागासलेला आहे. आजही या देशात स्त्रियांवर कमालीची बंधनं आहेत. स्वातंत्र्य हे जणू स्त्रियांसाठी नसते अशी दुर्बल मानसिकता घेऊन येथे लोक जन्मले आहे. क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान देशात नवनवीन बदल घडवू पाहत आहे. याआधी त्यांनी स्त्रियांवर गाडी चालवण्यास असलेली बंदी उठवली, काही महिन्यांपूर्वी चित्रपटगृह प्रेक्षकांसाठी खुले केले आता आणखी एक पाऊल उचलून सलमान यांनी जगाचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. या देशात पहिल्यांदाच फॅशन शो होणार आहे.

World Press Photo of the Year : धगधगत्या सूडाची काळीज पिळवटून काढणारी कहाणी

गेल्याकाही दिवसांपासून फॅशन शो होणार याच्या चर्चा होत्या. पण काही कारणानं दोनदा हा कार्यक्रम पुढे ढकलला. अखेर या शोची संपूर्ण तयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे. जगभरातील मोठे तसेच स्थानिक फॅशन ब्रँड आपलं कलेक्शन रॅम्पवर उतरवणार आहेत. दुबईच्या आलिशान हॉटेलमध्ये सौदीतला पहिला वहिला फॅशन शो पार पडणार आहे. त्यामुळे इथल्या महिलाही खूप उत्सुक आहे. त्याचप्रमाणे अनेकींना कुतूहल देखील आहे. कट्टर धार्मिक असलेल्या या देशानं एक पाऊल पुढे येऊन बदल घडवण्याचा प्रयत्न केला आहे. पण ,त्याचवेळी काही कडक नियमही घालण्यात आले आहे. हा फॅशन शो पूर्णपणे महिलांचा असल्यानं इथे फक्त महिलांनाचा उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रम्पवरही महिला मॉडेलच रॅम्पवॉक करणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त आणखी एक कडक नियम करण्यात आला आहे. फॅशन शोच्या दरम्यान छायाचित्रिकरणावरही पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. फॅशन शोमध्ये महिला आयबा परिधान न करताच रम्पवॉक करणार आहे. या देशात आयबाशिवाय महिला पुरुषांसमोर येऊ शकत नाही. त्यामुळे साहजिकच पुरुषांना या ठिकाणी प्रवेश पूर्णपणे निषिद्ध करण्यात आला असल्याचं समजत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2018 2:58 pm

Web Title: saudi arabias first ever fashion week but only women are permitted at catwalk events and outside photography is barred
Next Stories
1 World Press Photo of the Year : धगधगत्या सूडाची काळीज पिळवटून काढणारी कहाणी
2 फेकन्युज : बच्चन तसे म्हणालेच नाहीत!
3 फेसबुक, व्हॉट्स अॅप, ट्विटरला कंटाळलात? तर आता म्हणा ‘Hello’
Just Now!
X