सौदी राजांचे थाट आणि शौक काही विचारायला नको, पाण्यासारखा पैसा आणि श्रीमंती त्यांच्या पायावर लोळण घालत असते. त्यामुळे या राजांने शौकही मोठे असतात बुवा. यांच्या एक एक सवयी आणि जीवनशैली पाहून अनेक जण चक्रावून जातील. काही दिवसांपूर्वी एका राजाने आपल्या ८० ससाण्यांना विमानातून नेले असल्याचे तुम्ही  ऐकले असेलच. आता आणखी एका राजाचा थाट पाहा. सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुल अझीझ अल सौद नऊ दिवसांच्या इंडोनेशिया दौ-यावर जाणार आहे. अर्थात राजांसोबत मोठा लवाजामा जाणार हे वेगळं सांगायला नको, पण या दौ-यासाठी राजा ५०६ टन सामान घेऊन इंडोनेशियात येणार आहे हे ऐकल्यावर अनेकांना धक्काच बसला. या सामानासाठी राजाने खास कार्गो विमान मागवले असून राजाच्या तीन आलीशान गाड्याही त्यात असणार आहे.

वाचा : सौदी युवराजांच्या ८० ससाण्यांची विमान सफर व्हायरल

वाचा : अबुधाबीच्या युवराजांचं आलिशान विमान!

४६ वर्षांचे हे राजे पहिल्यांदाच इंडोनेशियाला भेट देणार आहे. इंडोनेशियात मुस्लिमांची संख्या जास्त आहे. राजकिय कारणासाठी ते या देशाला भेट देत आहेत. एका कंपनीवर राजांचे कार्गो हाताळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या कंपनीतले ५०० कर्मचारी राजाच्या सामानाची काळजी घेणार आहे यावरून तुम्ही राजाच्या श्रीमंतीची कल्पना करू शकता. हे काही पहिल्यांदाच होत नाही. २०१५ मध्ये या राजाने वॉशिंग्टनला भेट दिली होती. तेव्हा २२२ खोल्यांचं आलिशन हॉटेलच त्यांनी बुक केलं होतं.

वाचा : प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्यांच्या नावावर जगातील महागड्या लग्नसोहळ्याचा विक्रम