X

Viral : अन् सौदीच्या राजाचा सोन्याचा जिना ऐनवेळी बंद पडला

राजांची झाली मोठी पंचाईत

सौदीचे राजा सलमान यांचा थाटमाट आणि शौक याबद्दल काही विचारायलाच नको. पाण्यासारखा पैसा आणि श्रीमंती त्यांच्या पायावर लोळण घेते. त्यांच्या सवयी आणि जीवनशैली हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. राजा कोणत्याही देशात दौऱ्यासाठी किंवा सहलीसाठी गेले की सोबत हजारों कर्मचाऱ्यांचा ताफा, आलिशान गाड्या, स्वत:च विमान सोबत नेतात. त्यामुळे त्यांचा प्रत्येक दौरा हा चर्चेचा विषय असतो. या आठवड्याच्या सुरुवातीला राजा सलमान यांनी रशियाला भेट दिली. जेव्हा राजे सलमान यांचं विमान मॉस्को विमानतळावर आलं त्यावेळी एक मजेशीर घटना घडली.

राजांनी सोबत आणलेले सरकते जिने हे ऐनवेळी बंद पडले त्यामुळे राजांची मोठी पंचाईत झाली. यंत्र सुरू होण्याची ते वाट बघत होते पण काही केल्या हे यंत्र मात्र सुरू होईना. शेवटी ते वैतागून चालतच जिन्यावरून खाली उतरले. राजांनी स्वत:साठी सोन्याने मढवलेले सरकते जिने तयार करून घेतले होते. त्यामुळे सलमान यांच्या सोन्याच्या जिन्याबद्दल वेगळंच कुतूहल रशियन लोकांच्या मनात होतं. पण ऐनवेळी ते बंद पडल्याने त्यांची फजिती झाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यावर भन्नाट प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

आता विश्वास ठेवायचा कोणावर? वेश बदलून फावल्या वेळेत पोलीस अधिकारी करायचा चोरी!

राजे चार दिवसांच्या रशियाच्या दौऱ्यावर आले होते, यावेळी त्यांनी स्वत:सोबत १५०० कर्मचाऱ्यांचा ताफा आणला होता. राजांसाठी सौदी सरकारने दोन अलिशान हॉटेलही बुक केले. आश्चर्य म्हणजे राजांना लागणाऱ्या खाण्यापिण्याच्या वस्तू रियाधमधून दररोज मॉस्कोमध्ये विमानाने पाठण्यात येत होत्या. ऑगस्ट महिन्यात राजांच्या मोरोक्को दौऱ्याचीही चर्चा होती. ते मोरोक्कोमध्ये सहलीसाठी गेले होते. या सहलीसाठी त्यांनी ६ अब्ज ४० कोटी ५५ लाखांहून अधिक रक्कम खर्च केली होती. मोरोक्कोला पर्यटन व्यवसायातून जेवढा नफा मिळतो. त्यातील दीड टक्के रक्कम सलमान यांच्या या सहलीतूनच या देशाला मिळाला होता. आठवड्याभराच्या सहलीसाठी त्यांनी २०० लक्झरी कारचा ताफा सोबत नेला होता. तर इंडोनेशियाच्या दौऱ्याच्या वेळी त्यांनी ५०० टन सामान सोबत नेलं होतं.

१५९ तासांचा ओव्हरटाईम केल्याने महिला पत्रकाराचा मृत्यू

वाचा / प्रतिक्रिया द्या
Outbrain