गेल्याच महिन्यात लिओनार्दो दा विंचींच्या ५०० वर्षे जुन्या चित्राचा लिलाव पार पडला. लिलाव प्रक्रियेत भाग न घेता एका व्यक्तीनं फक्त फोनवरून सर्वात उच्च बोली लावून ते चित्र विकत घेतलं होतं. ते चित्र थोडथोडकं नाही तर तब्बल ३ हजार कोटी रुपये मोजून खरेदी करण्यात आलं होतं. या चित्राच्या किंमतीने २०१५ मध्ये झालेल्या पिकासोच्या चित्राच्या लिलावाचे रेकॉर्डही तोडले होते. लिओनार्दो दा विंचींच्या या चित्राचं नाव होतं ‘साल्वाडोर मुंडी’. ते ख्रिस्ताचं चित्र होतं.

घर, दुचाकी आणि ती; वर्षभरात दाना मांझीचे आयुष्यच बदललं

लिओनार्दो दा विंचींनी काढलेल्या सगळ्याच चित्रांना आजही जगभरात मोठी मागणी आहे. नोव्हेंबर महिन्यात ‘साल्वाडोर मुंडी’ या चित्रासाठी लिलाव पार पडला होता. काही वेळातच खरेदीदाराने फोनवर या चित्रासाठी बोली लावली आणि ३ हजार कोटी रूपये मोजून ते चित्र विकत घेतले. खरेदीदाराचं नाव मात्र गुप्त असल्यानं सगळ्यांनाच या चित्राच्या खरेदीदाराबद्दल जाणून घेण्याच कुतूहल निर्माण झालं.

Viral Video : ‘हा’ अफलातून डान्स पाहून तुम्हीही चक्रावून जाल

हा खरेदीदार सौदीचा एक राजपूत्र असल्याचं ‘द न्यूयॉर्क टाइम्स’नं म्हटलं आहे. या राजपुत्राचं नाव बादेर बीन मोहम्मद बीन फरहान अल सौद असल्याचं समोर आलं आहे. यापूर्वी या राजपुत्रानं कोणतेही दुर्मीळ चित्र खरेदी केल्याची नोंद आढळत नाही किंवा त्यांच्याकडे अमाप संपत्ती असल्याचेही संदर्भ आढळत नाही. म्हणूनच राजपूत्र बादेर यांनी हे चित्र का खरेदी केलं हा सगळ्यांच्याच कुतूहलाचा विषय ठरला आहे.