सौदी अरेबियात भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत ११ राजपुत्र आणि डझनावारी आजी-माजी मंत्र्यांना अटक करण्यात आली. अटक झालेल्यांमध्ये टि्वटर, अ‍ॅपल यासारख्या पाश्चात्य कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक असलेले अब्जाधीश प्रिंस अल वालीद बिन तलाल यांचाही समावेश आहे. ते अटकेत असले तरी त्यांची कन्या रीम ही वेगळ्याच कारणानं सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

अन् त्याने ब्रेकअपनंतर प्रेमाचा ‘बाजार’ मांडला

सौदी अरेबियात स्त्रियांना अनेक अधिकारांपासून दूर ठेवलं गेलं, इथे कोणतीही स्त्री बुरखा धारण केल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. स्त्री स्वातंत्र्य नावाचा प्रकार सौदीत तरी अस्तित्त्वात नाही, त्यातून राजघराण्यातली स्त्री म्हटल्यावर तिच्यावर विशेष बंधन असतात, त्यामुळे अल वालीद बिन तलाल यांची पूर्वाश्रमीची पत्नी आमीरा सोडली तर खुलेपणाने वावरणाऱ्या राजघराणातल्या स्त्रिया फार कमीच दिसल्या. आमीरा या आपल्या स्टाईल स्टेटमेंटमुळे फक्त सौदीतच नाही तर जगभरात चर्चेत होत्या. आता अल वालीद बिन तलाल यांची मुलगी रीमही राजकुमारी आमीरा यांच्या पावलावर पाऊल ठेवत आपल्या ‘स्टाईलीश लाईफस्टाईल’मुळे चर्चेत आली आहे. रीम ही कट्टर इस्लामिक देशाची राजकन्या असली तरी तिची विचारसारणी मात्र मुक्त आहे. अमेरिकेतल्या एका विद्यापीठातून तिने विज्ञान शाखेतून पदवी घेतली आहे, त्याचप्रमाणे तिला फोटोग्राफीचाही छंद असल्याचे समजतं. काही महिन्यांपूर्वी तिने पहिल्यांदा माध्यमांना मुलाखत दिली होती, त्यावेळी तिने बुरखा धारण केला होता, बुरख्यामुळे कोणालाही तिला पाहाता आलं नाही पण नंतर हिच रीम सोशल मीडियावर मात्र खुलेपणाने समोर येऊ लागली.

राष्ट्राध्यक्षांशी घेतलेला ‘पंगा’ तिला पडला महागात

सौदीची ही राजकन्या सोशल मीडियावरील सर्वात चर्चित व्यक्तिमत्व आहे, अनेकजण तिची तुलना अभिनेत्री किम कार्देशियनशी करत आहेत.