सोशल मीडियावर एका चेटकीणीचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर सुरुवातीला कुणालाही थोडीशी भीती वाटेल. मात्र ही चेटकीण नसून एक बुजगावणं आहे. एका चेटकीणीसारखी हालचाल पाहता अनेकांचा थरकाप उडतो. पक्षी, कावळ्यांना दूर पळवण्यासाठी ही क्लुप्ती करण्यात आली. एका स्प्रिंगला सायकलचं हँडल जोडण्यात आलं आहे. तर हँडलच्या दोन्ही बाजूला बुजगावण्याचे हात बांधण्यात आले आहेत. हे बुजगावणं प्रत्यक्ष जागेवर कल्पना नसताना पाहिलं, तर काळजाचा ठोका चुकेल, हे मात्र नक्की आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून आतापर्यंत ७० हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ ९ सेकंदाचा आहे. कप्तान हिंदुस्तान या ट्विटर खातेधारकाने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कावळे काय?, सर्वांनाच काही भीती वाटत आहे. एखाद्या भयपटातील चेटकीणीसारखा हा व्हिडिओ वाटत आहे. नेटकरी या व्हिडिओला पसंती देत असून वेगावने व्हायरल होत आहे. नेटकरीही या व्हिडिओला आपल्या शैलीत कमेंट्स देत आहेत.

बुजगावण्याला एक भितीदायक चेहरा लावण्यात आला आहे. तसेच शर्ट आणि लाल स्कार्फ आणि निळा स्कर्ट घालण्यात आला आहे. हवेच्या वेगाने स्प्रिंग हलते. तशी त्या बुजगावण्याची हालचाल होत आहे. असं वाटतं की एखादी चेटकीणच आपल्या समोर आली आहे.