चीनचे पूल फारच अजब असतात, या पूलावरून जायचं म्हणजे फारच धाडस लागतं बाबा. हे सांगायचं कारण यासाठी की जगातील अनेक उंच पूल चीनमध्ये आहेत. तुम्हाला काचेचा पूल आठवतोय का? तोही चीनमध्येच आहे. तर अशा पुलावरून चालत जाणं म्हणजं काही स्टंटपेक्षा कमी नाही. आता चीन पाहायला आलेल्या या पर्यटकांना याची चांगलीच प्रचिती आली असेल हे नक्कीच. चीनच्या पूल अपघाताचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो पाहिला तर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही हे खरं.

काही पर्यटक लाकडाच्या पूलावर उभे राहून छान निसर्ग सौंदर्य पाहण्यात व्यग्र होते आणि अचानक असे काही घडले की बघणाऱ्याचा श्वासच रोखला. हा लाकडाचा पूल क्षणार्धात एका बाजूला कलंडला आणि या पूलावर असलेले सारे पर्यटक अधांतरी हवेत लटकू लागले. नदीवर हा पूल असल्याने साऱ्या पर्यटकांच्या जीवाला धोका होता. पण कोणी काहीच करू शकले नाही. शेवटी पर्यटकांनी आपली सुटका आपणच करून घ्यायची ठरवली. सुदैवाने यात एकही पर्यटक जखमी झाला नाही. कदाचित सारा तोल एका बाजूला गेल्याने हा पूल कलंडला असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या पूलावर पर्यटकांची संख्या प्रमाणापेक्षा जास्त होती, त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली असल्याचे इथल्या पर्यटकांन मंत्र्यांनी सांगितले आहे. दरम्यान याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे तो व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा !