03 March 2021

News Flash

प्लॅस्टिकने मिळवा उन्हाळ्यापासून मुक्ती!

थंडा थंडा कूल कूल....

हे प्लास्टिक उष्णता शोषतं

सध्या उन्हाळ्याने जीव हैराण झालाय. फळांचा रस, कोल्डड्रिंकचा खप प्रचंड वाढला आहे. दिवसा दोनदा आंघोळ केली तरी लाही लाही होते. खिडकी उघडी ठेवावी तर दुपारी उन्हाच्या झळा आत येतात खिडक्या बंद कराव्यात तर गरमीने जीव हैराण होतो. वाळ्याचे पडदे लावण्याचा उपाय आहे खरा पण तेही मेंटेन करावे लागतात

“तुम्ही ना गरम होणं टाळण्यासाठी तुमच्या बिल्डिंगला प्लॅस्टिकचं कव्हर घाला”

हा असा उपाय सांगणारा अर्ध्या तासात हाॅस्पिटलमध्ये दाखल होईल

पण आता खरोखरच असं प्लॅस्टिकचं कव्हर आलं आहे की जे तुमच्या घरातलं तापमान कमी करून तु्म्हाला ‘गर्मी में छंडी का एहसास देईल’.
अमेरिकेतल्या कोलोरॅडो विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हे प्लॅस्टिक तयार केलं आहे. साधं प्लॅस्टिक हे ‘पाॅलिथीन’ पासून तयार केलेलं असतं. पण हे प्लॅस्टिक ‘पाॅलि मिथाईल पेंटीन’ या रसायनापासून तयार केलेलं आहे. हे प्लॅस्टिक एकाचवेळी पारदर्शक फिल्म आणि प्रकाश परावर्तित करणाऱी फिल्म अशा पध्दतीने काम करतं. हे प्लॅस्टिक खिडक्यांना लावलं तर आपण नेहमीच्या काळ्या फिल्मसारखा प्रकाशकिरण शोषून घेत खोली थंड ठेवण्याचं काम करतो. तर तुमच्या घराच्या किंवा बिल्डिंगच्या बाहेरच्या भिंतीवर हे प्लॅस्टिक लावल्यानंतर भिती तापत नाहीत.
महत्त्वाचं म्हणजे या फिल्मचा वापर केला की घरातलं तापमान कमीत कमी २०% नी कमी होतं असं ही फिल्म बनवणाऱ्या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. हा फिल्मची एक चौरस मीटर फिल्म एका खोलीचं तापमान ४० अंश सेल्सियसपासून २० अंश सेल्सियसपर्यंत आणू शकते असं .या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 6:21 pm

Web Title: scientists develop a special plastic cool plastic
Next Stories
1 Viral Video : उचलली जीभ आणि लावली फिरत्या पंख्याला
2 Viral Video : शस्त्रधारी चोरांना ‘त्या’ धाडसी महिलांनी जन्माची अद्दल घडवली!
3 वाचा अशा तरूणाबाबत ज्याला पंतप्रधान मोदीही ‘फाॅलो’ करतात
Just Now!
X