जखमेवर बांधण्यात येणारी मलमपट्टी आता बांबूपासून बनवण्याचा विचार वैज्ञानिक करत आहे. बांबूमधील सेल्यूलोज आणि चांदीमधील नॅनोपार्टीकल्सपासून बनवण्यात आलेली पट्टी ही जखम लवकर बरी करण्यास मदत करू शकते.

VIDEO : आजारातून लवकर बरं होण्यासाठी डॉक्टर महिलाच हवी!- संशोधन

सध्या ज्या प्रकारच्या मलमपट्टी वापरण्यात येतात, त्यात अनेक त्रूटी असल्याचे लक्षात येत आहे. या मलमपट्टींना काही काळानंतर दुर्गंधी येते तसेच याने जखमही लवकर बरी होत नाही असे लक्षात आले आहे. त्यामुळे सी.एस.आई.आर हिमालय जैवसंपदा विद्यापीठाद्वारे यावर अधिक संशोधन करण्यात आले. बांबूच्या दोन प्रजातींमधील सेल्यूलोज वापरून तयार करण्यात आलेल्या मलमपट्ट्या या जखम भरून काढण्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याचे म्हटले आहे.

एका जखमी उंदरावर हा प्रयोग करण्यात आला. उंदराच्या जखमेवर ही मलमपट्टी बांधली होती. या बांबूच्या मलमपट्टीमुळे ती जखम लवकरच बरी झाल्याचे आढळून आले. यावर आता अधिक संशोधन सुरु आहे. कोणत्या प्रकारच्या जखमेवर मलमपट्टी करणे फायदेशी ठरेल यावरही संशोधक होत आहे. दरम्यान हा प्रबंध आधी कार्बोहायड्रेट पॉलिमर्समध्ये प्रसिद्ध करण्यात आला.