समलैंगिकता गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. परस्परसंमतीने ठेवल्या जाणाऱ्या समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या भारतीय दंड विधानाच्या (आयपीसी) कलम ३७७ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी पार पडली त्यावेळी हा निर्णय देण्यात आला. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशातील सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या या निर्णयाचे जगभरातील बड्या कंपन्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने स्वागत केले. काहींनी आपले प्रोफाइल फोटोंवर इंद्रधनुष्याचे रंग ठेवले तर काहींनी अगदी अनोख्या पद्धतीने या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. जाणून घेऊयात याच आगळ्या वेगळ्या सेलिब्रेश्नस बद्दल…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुगल

गुगल इंडियाने आपल्या होमपेजवर सर्च बॉक्स खाली इंद्रधनुष्याच्या रंगाचा झेंडा लावला होता. समलैंगिक संबंध गुन्हा नाही हा सर्वोच्च न्यायलयाचा निकाल येताच गुगल इंडियाच्या होमपेजवर हा झेंडा फडकू लागला. इंद्रधनुष्याच्या रंगांचा झेंडा एलजीबीटी समाजाचं प्रतिक आहे. म्हणूनच गुगलने अगदी आपल्या औपचारिक फेसबुक पेजचा प्रोफाइल फोटोही इंद्रधनुष्याच्या रंगांचा केला. त्याचप्रमाणे त्यांनी गुगलच्या लोगोमधील रंग वापरून एक छोटी जीफ इमेजही पोस्ट केली.

उबर

देशातील अव्वल टॅक्सी सेवा पुरणाऱ्या अॅप्लिकेशन्सपैकी एक असणाऱ्या उबरनेही या निर्णयाचे इंद्रधुनष्याच्या रंगात रंगून सेलिब्रेशन केले. उबर इंडियाने आपल्या अॅपवर दाखवण्यात येणाऱ्या पीक आणि ड्रॉप पॉइण्टमधील रस्त्यांला इंद्रधनुष्याचा सप्तरंगात रंगवले. अनेकांनी ट्विटवर या आगळ्या वेगळ्या सेलिब्रेशनचे आणि उबरने वापरलेल्या कल्पनेचे कौतूक करत स्क्रीनशॉर्ट पोस्ट केले आहेत.

या आगळ्या कल्पनेबरोबरच आपला डीपी इंद्रधनुष्याच्या रंगाचा करण्याबरोबरच उबरच्या फेसबुक पेजवर सप्तरंगांमध्ये रोडसारखी डिझाइन वापरून PRIDE हा शब्द पोस्ट करण्यात आला. तसेच यावर राईड विथ प्राईड असेही उबरने आपल्या फॉलोअर्सला सांगितले आहे.

ओला

ओला इंडियानेही आपल्या ट्विटवर राईड नाऊ या टॅगलाइनमध्ये बदल करत प्राईड स्टार्ट नाऊ असा संदेश सप्तरंगी झेंड्यावर पोस्ट करत तो ट्विट केला.

युट्यूब इंडिया

जगातील सर्वात मोठी व्हिडीओ स्ट्रीमिंग कंपनी असणाऱ्या युट्यूब इंडियाच्या अकाऊण्टवरूनही या संदर्भात आनंद व्यक्त करण्यात आला. या इमेजमध्ये त्यांनी युट्यूबचे प्ले बटण सप्तरंगांमध्ये रंगवले होते. यावर युट्यूबने We’re beaming with #Pride अशी ओळही पोस्ट केली.

नेटफिक्स इंडिया

नेटफिक्स इंडियाने आपला डिस्प्ले फोटो बदलून सप्तरंगी केला. तसेच त्यांनी समलैंगिक संबंधांवरील सिनेमांमधील काही फोटोंचे कोलाज ट्विट करुन लव्ह इज लव्ह असा हॅशटॅग वापरला आहे.

फ्लिपकार्ट

फ्लिपकार्टनेही आपल्या ट्विटवरील डिस्प्ले पिकवर इंद्रधनुष्याच्या रंगाचा झेंडा फडवला. याहून भन्नाट म्हणजे त्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपला आनंद व्यक्त करणारा फोटो पोस्ट केला. या पोस्टमध्ये त्यांनी कलम 377 ऑर्डर 1861 आणि कॅन्सल 2018 असे पोस्ट करत त्यावर ओनली कॅन्सलेशन ज्याची आम्ही वाट पाहत होतो अशी ओळ पोस्ट केली आहे.

फेसबुक इंडिया

फेसबुक इंडियाने या निर्णयाचे स्वागत केले आहे. अभिनंदन LGBTQ कम्युनिटी इन इंडिया! सुप्रीम कोर्टाने घेतलेला हा निर्णय हा निर्णय ऐतिहासिक आहे असे म्हणत फेसबुक इंडियाच्या फेसबुक पेजवरील प्रोफाइल फोटोही बदलण्यात आला आहे.

फेसबुकच्या साथीने त्याचा आनंद साजरा करा असा संदेश फेसबुक इंडियाने दिला असून युझर्सला प्रोफाइलवर वेगवेगळ्या फ्रेम्स लावण्याचा पर्यायही दिला आहे.

या शिवाय तरुणाईमध्ये चर्चा असलेल्या अनेक कंपन्यांनी या निर्णयाचे आपल्या सोशल नेटवर्किंग पेजेवरून स्वागत केले आहे. यामध्ये अगदी एमटीव्ही सारख्या चॅनेल्सपासून तर भाडिप, एआयबी, टीव्हीएफसारख्या कंपन्यांचाही समावेश आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Section 377 verdict this his how tech companies celebrated the verdict
First published on: 07-09-2018 at 11:51 IST