News Flash

पार्टीमध्ये दारु संपल्याने हॅण्ड सॅनिटायझर प्यायल्याने सात जणांचा मृत्यू ; दोघे कोमात

दोन जण कोमात असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे

प्रातिनिधिक फोटो

रशियामधील एका गावामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पार्टीदरम्यान दारु संपल्यामुळे लोकांनी हॅण्ड सॅनिटायझर प्यायलं. मात्र त्यानंतर घडलेला प्रकार आणखीन भयंकर होता. सॅनिटायझर प्यायल्याने त्रास होऊ लागल्याने पार्टीला उपस्थित असलेल्या नऊ जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला तर दोन जण कोमात असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा सर्व प्रकार तातिनसकी जिल्ह्यातील तोमतोर गावामध्ये घडला. या नऊ जणांनी जे सॅनिटायझर प्यायलं त्यामध्ये ६९ टक्के मिथेनॉल होतं.

डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार या पार्टीला उपस्थित असणाऱ्या तीन जणांचा मृत्यू झाल्यानंतर उरलेल्या सहा जणांना एअर अ‍ॅम्ब्युलन्सच्या मदतीने जिल्ह्याची राजधानी असणाऱ्या याकुत्स्क येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र या रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान आणखीन चार जणांचा मृत्यू झाला. रशियातील आरोग्य व्यवस्थासंदर्भात काम करणाऱ्या रेस्पोत्रीबॅनॅझोरने दिलेल्या माहितीनुसार सॅनिटायझर पॉयझनिंगच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करुन घेण्यात आला आहे.

रशियन सरकारने यापूर्वी अनेकदा सॅनिटायझर पिऊ नया असं आवाहन वेगवेगळ्या माध्यमातून केलं आहे. रशियाच नाही जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये अशाप्रकारे दारु उपलब्ध नसल्याने सॅनिटायझर प्यायल्याच्या घटना मागील काही महिन्यांमध्ये समोर आल्या आहेत. मात्र एकाच वेळी सात जणांचा सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे. सॅनिटायझरमध्ये वापरले जाणारे घटक आणि मद्यामधील घटक हे सारखेच असल्याने ते पिण्यासाठी योग्य आहे अशा चुकीच्या माहितीमुळे अनेकजण दारुऐवजी सॅनिटायझर प्यायल्याचे तपासांमध्ये उघड झालं आहे. मात्र सॅनिटायझर पिणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे असं डॉक्टर सांगतात.

रशियामध्ये आतापर्यंत (रविवार, २२ नोव्हेंबर २०२० पर्यंत) करोनाचे २० लाख ६४ हजार ७४८ रुग्ण आढळून आले आहेत. देशामध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३५ हजार ७७८ जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरामध्ये करोनाबाधितांची संख्या पाच कोटी ८० लाखांहून अधिक झाली आहे. जगभरामध्ये करोनामुळे मरण पावलेल्यांच्या संख्येने १३ लाख ८० हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2020 8:17 am

Web Title: seven people dead after drinking hand sanitiser at party in russia scsg 91
Next Stories
1 Video : ‘बूटा बोमा’वर डेव्हिड वॉर्नरनं पत्नी, मुलीसह केला भन्नाट डान्स
2 रोहितवर शंका घेणाऱ्या ब्रॅड हॉगला वासिम जाफरने केलं ट्रोल, म्हणाला…आजा बेटा आजा
3 कुणाल कामराला ‘सामना’च्या ‘त्या’ बातमीवर हवीय कंगनाची स्वाक्षरी
Just Now!
X