27 February 2021

News Flash

व्हिडीओत माकडाच्या गुप्तांगाला स्पर्श करताना दिसली महिला, 3 वर्षांची शिक्षा

पाळीव प्राण्यांच्या दुकानात असताना ती एका माकडाच्या गुप्तांगाला स्पर्श करताना आणि हसताना व्हिडीओत दिसत होती

माकडाचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी इजिप्तच्या एका न्यायालयाने एका 25 वर्षीय महिलेला दोषी ठरवलं आहे. बस्मा अहमद असं या महिलेचं नाव असून कोर्टाने 3 वर्ष तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

ऑक्टोबर महिन्यात 90 सेकंदाचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बस्मा अहमद हिला अटक करण्यात आली होती. पाळीव प्राण्यांच्या दुकानात असताना ती एका माकडाच्या गुप्तांगाला स्पर्श करताना आणि हसताना व्हिडीओत दिसत होती. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याच्या आरोपाखाली या महिलेला अटक करण्यात आली होती.

न्यायालयात महिलेने आपला गुन्हा कबुल केला, मात्र माझा असा कोणताही उद्देश नव्हता असंही तिने स्पष्ट केलं. तसंच एका मैत्रिणीने व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि न सांगता इंटरनेटवर अपलोड केल्याचं तिने न्यायालयात सांगितलं. मात्र, संबंधित महिलेने पहिल्यांदाच असं कृत्य केलेलं नाही यापूर्वी दोन वेळेस तिच्यावर अनैतिकतेचे आरोप झाले आहेत असा युक्तिवाद तिच्याविरोधात करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी न्यायालयाने तिला दोषी ठरवलं आणि तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2018 1:35 pm

Web Title: sexually harassing a monkey egypt woman jailed for three years
Next Stories
1 Video : सोहळ्यादरम्यानच्या आतिशबाजीनं ‘मिस आफ्रिके’च्या केसांना स्टेजवर लागली आग
2 ‘मस्तानी हो गई’ गाण्यावर थिरकल्या अमृता फडणवीस, व्हिडीओ व्हायरल
3 पोलीस ‘ओय’ नाही ‘हाय’ म्हणणार
Just Now!
X