23 February 2019

News Flash

शार्कसोबत फोटोशूट करणं पडलं महागात, हल्ल्यात १९ वर्षीय मॉडेल जखमी

अशा फोटोंना मिळणारी प्रसिद्धी पाहता मॉडेल्स धोका पत्करायला तयार होतात.

फोटोशूट सुरू असताना शार्कनं तिच्यावर अचानक हल्ला केला यात तिच्या हाताला दुखापत झाली आहे.

शार्कसोबत निळ्याशार समुद्रात फोटोशुट करण्याचा ट्रेंड काही नवा नाही. याआधी अनेक प्रसिद्ध मासिकांच्या मॉडेल्सनं शार्कसोबत फोटोशूट केलं आहे. दिसायला हे फोटे आकर्षक असले तरी या फोटोशूटसाठी खूप मोठी जोखीम मॉडेल्सना उचलावी लागते. पण अखेर अशा फोटोंना मिळणारी प्रसिद्धी पाहता मॉडेल्स धोका पत्करायला तयार होतात.

मात्र या हल्ल्यात कॅलिफोर्नियामधील १९ वर्षीय मॉडेल जखमी झाली आहे. बहामास येथे या शार्कसोबत फोटोशूट करत असताना कॅथरिना झरुत्स्की जखमी झाली आहे. प्रियकर आणि त्याच्या कुटुंबियांसोबत सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी ती बहामासला गेली होती. यावेळी शार्कसोबत फोटो काढण्याचा मोह तिला अनावर झाला. मात्र हे फोटोशूट सुरू असताना शार्कनं तिच्यावर अचानक हल्ला केला यात तिच्या हाताला दुखापत झाली आहे.

जवळपास ५ फूट लांब असलेल्या या शार्कनं तिच्यावर हल्ला करून तिला पाण्याच खेचून नेण्याचा प्रयत्न केला मात्र तिनं कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली. कॅथरिननं हा अनुभव शेअर केला असून मॉडेल्सना अशा प्रकारे जीव धोक्यात न घालण्याची विनंतीही तिनं केली आहे.

First Published on July 11, 2018 1:23 pm

Web Title: shark bites instagram model during photo shoot photo goes viral