काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देशाच्या अर्थव्यवस्थेवरुन निशाणा साधाला आहे. थरूर यांनी सन २०१७ पासून २०१९-२० च्या आर्थिक वर्षांमधील जीडीपी म्हणजेच राष्ट्रीय सखल उत्पन्नामधील घट होणाऱ्या आलेखाची (ग्राफची) तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाढीशी केली आहे. थरुर यांनी पंतप्रधा नरेंद्र मोदींचे पाच फोटो आपल्या ट्विटमध्ये वापरले आहेत. या पाचही फोटोंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाढीची लांबी वेगवेगळी असल्याचे दिसत आहे. याच मोदींच्या वाढलेल्या दाढीची तुलना एका आलेखाच्या मदतीने भारताच्या घसरत जाणाऱ्या जीडीपीशी करण्यात आली आहे.

नक्की वाचा >> “फडणवीस रोज पहाटे चार वाजता उठून राज्यपालांना फोन करून विचारतात…,” कुणाल कामराचं खोचक ट्विट

bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
How much added sugar does your Favorited packet
तुमच्या आवडत्या चिप्समध्ये साखरेचे प्रमाण किती असते? ते कसे ओळखावे घ्या जाणून…
sensex, 75000 points , share market news loksatta,
‘सेन्सेक्स’ची ऐतिहासिक ७५ हजारांच्या शिखरावरून माघार
Among the vehicles inspected by the RTO 14 percent of the vehicles are polluting
मुंबई : आरटीओने तपासलेल्या वाहनांमध्ये १४ टक्के वाहने प्रदूषणकारी

सन २०१७-१८ च्या आर्थिक वर्षामध्ये भारताचा जीडीपी ८.१ असल्याचे या ग्राफमध्ये दिसत आहे. तर हाच जीडीपी २०१९-२० च्या आर्थिक वर्षामध्ये ४.५ टक्क्यांपर्यंत गडगडल्याचं दाखवण्यात आलं आहे. “ग्राफिक अलेस्ट्रेशन म्हणजे काय याचं हे उत्तम उदाहरण आहे,” अशा कॅप्शनसहीत थरूर यांनी हा फोटो शेअर केला आहे.

करोनामुळे भारताच्या जीडीपीला मोठा फटका बसला आहे. तर डीबीएस समुहाच्या अहवालानुसार जीडीपीची ६.८ टक्क्यांपर्यंत घसरण होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. १३ हजारहून अधिक जणांनी हा फोटो रिट्विट केला आहे. तर हा फोटो लाईक करणाऱ्यांची संख्या ६६ हजारांहून अधिक आहे.

२०२०-२१ च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये भारताच्या जीडीपीमध्ये १.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील दोन तिमाहीमध्ये सतत घसरण झाल्यानंतर पहिल्यांदाच जीडीपीमध्ये सकारात्मक आहे. करोनासंदर्भातील निर्बंध वर्षाच्या शेवटी आणि सुरुवातील शिथिल करण्यात आल्याने लोकांनी अधिक प्मराणात पैसे खर्च करण्यास सुरुवात केल्याने जीडीपीमध्ये सकारात्मक वाढ दिसून आल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र आता करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने याचा जीडीपीला फटका बसण्याची भीतीही व्यक्त केली जातेय.