दिल्ली शहर आणि राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात हवेच्या प्रदूषणामुळे श्वास घेणे देखील मुश्कील झाले आहे. येथील वायुप्रदूषणाची स्थिती इतकी खालावली की पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकारणाने संपूर्ण दिल्ली परिसरात आरोग्य आणीबाणी जाहीर केली. या वायुप्रदूषणाविरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी शरूर यांनी टीका केली आहे.

“कब तक जिंदगी काटोगे सिगारेट, बीडी, और सिगार में… कुछ दिन तो गुजारिये दिल्ली NCR में…” अशा मिष्किल शब्दात शशी शरूर यांनी ट्विट केले आहे. त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

 

त्यांच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे.

 

अत्यंत गंभीर स्थिती

हवेची गुणवत्ता सरासरी ०-५० इतकी असेल तर हवेची गुणवत्ता श्रेणी उत्तम मानली जाते. ५१-१०० ही श्रेणी समाधानकारक, १०१-२०० मध्यम, २०१-३०० घातक, ३०१-४०० अत्यंत घातक, ४०१-५०० अत्यंत गंभीर अशा श्रेणीमध्ये हवेतील प्रदूषणाची स्थिती मोजली जाते. शुक्रवारी दिल्लीत हवेची गुणवत्ता सरासरी ५०० हूनही अधिक म्हणजेच अत्यंत गंभीर या श्रेणीत होती. वायुप्रदूषणामुळे काळवंडलेल्या दिल्लीत काही फुटांपलीकडे दिसत नव्हते. दृश्यमानता कमी झाल्याने भर दुपारीदेखील वाहनाचालकांना दिवे लावून कार चालवाव्या लागत होत्या. सामान्य दिल्लीकरही मास्क लावून घराबाहेर पडलेले होते.