सोशल नेटवर्किंगवर कधी कोणती गोष्ट चर्चेत येईल सांगता येत नाही. सध्या अशाच एका फोटोची सोशल नेटवर्किंगवर चर्चा सुरु आहे. हा फोटो आहे शायून मेंडेलूक हिचा. व्यवसायिक आणि इन्स्टाग्रामवर फॅशन इन्फ्लुएन्सर आणि तज्ज्ञ असणाऱ्या शायूनने नुकतेच एक फोटोशूट केले. यामध्ये ती एका भरजरी लेहंग्यामध्ये आपल्या लहान मुलाला स्तनपान करताना दिसत आहे.
View this post on Instagram
महागड्या लेहंग्यामध्ये बाळाला स्तनपान करतानाचे फोटो शूट करण्यामागे खास कारण असल्याचे तिने हे फोटो पोस्ट करताना स्पष्ट केले आहे. मूळची दक्षिण आशियामधली असलेल्या शायूनने हे फोटोशूट आशियामधील लोकांना संदेश देण्यासाठी केल्याचे म्हटले आहे. जागतिक स्तनपान आठवड्यानिमित्त तिने हे फोटो पोस्ट करत आशियामधील लोकांना त्यांच्या स्तनपानाविषयी असणाऱ्या न्यूनगंडामधून मुक्त होण्यास सांगितले आहे.
View this post on Instagram
व्हायरल झालेल्या या फोटोशूटमधील फोटोंमध्ये शायून लेव्हेंडर रंगाच्या लेहंग्यामध्ये दिसत आहे. या लेहंग्यावर फुलांचे नक्षीकाम आहे. या लेहंग्याला साजेरा ब्लाऊज शायूनने परिधान केला होता. यावर तिने दक्षिण आशियाई देशांमध्ये पारंपारिक कपड्यांसोबत घालणारे दागिने म्हणजेच नथ, माथ्यावरचा टिळक म्हणून झुमर, दोन पारंपारिक पद्धतीचे कानातील डूल आणि हार घातल्याचे दिसत आहे.
View this post on Instagram
शायूनचे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर या फोटोंमागील अर्थ समजून घेणाऱ्या फॉलोअर्सचे आभार मानले आहेत. “माझ्या शेवटच्या पोस्टला मिळालेला प्रतिसाद पाहून मला खूपच आनंद झाला आहे. ज्यांना ज्यांना या फोटोंमागील अर्थ कळला आणि त्यांनी तो शेअर करत इतरांपर्यंत पोहोचवला त्या सर्वांना धन्यवाद. माझ्या शब्दांनी तुम्हाला प्रेरणा मिळो हिच माझी इच्छा आहे. मला त्या फोटोंमधून कोणावरही टीका करायची नव्हती. मला फक्त एवढचं सांगायचं होतं की तुम्ही तुमच्या पद्धतीने आयुष्य जगा, कसलीही लाज आणि खदखद मनात न ठेवता जगा,” असं तिने या आभार प्रदर्शनाच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 12, 2019 5:23 pm