जेवण झाल्यानंतर दातात अत्यंत छोटे अन्नाचे कण अडकतात. हे अन्नाचे कण काढण्यााठी टूथपिकचा वापर केला जातो. विविध प्रकारच्या या टूथपिक बाजारात उपलब्ध आहेत. पण तुम्ही कधी दातातले अन्न काढायला जिवंत पक्ष्याच्या चोचीचा वापर केलेला पाहिलं आहे का? हो तुम्ही वाचलेले खरे आहे. सध्या इंटरनेटवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात एका व्यक्तीच्या हातात चिमणी आहे. तो दातात अडकलेलं अन्न काढण्यासाठी पक्ष्याच्या चोचीचा वापर करतोय. हा व्यक्ती जेव्हा त्याचं तोंड उघडतो तेव्हा पक्षी त्याच्या तोंडातले अन्न काढते. आपल्या चोचीने या व्यक्तीचे दात साफ करणारा पक्षी हे काम कसे करतो हे पाहण्यासाठी नेटीझन्स या व्हिडियोवर तुटून पडले आहेत.

हा व्हिडिओ फेसबुक, ट्विटर, यूट्यूब आणि व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहेत. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून लाइकही केले आहे. हा व्हिडिओ नक्की कुठला आहे आणि तो व्यक्ती कोण आहे याबद्दल कोणतीही ठोस माहिती अद्याप समोर आली नाही. ही चिमणी वूडपिकर जातीची असून या जातीच्या चिमणीला पाळले जाते आणि आपले आगळेवेगळे शोक पूर्ण करण्यासाठी तिचा वापर केला जातो.