वेस्ट इंडिज दौऱ्यावर न जाता धोनी पुढचे दोन महिने लष्करात सेवा बजावणार आहे. महेंद्रसिंह धोनीची पोस्टिंग काश्मीरमध्ये करण्यात आली आहे. पेट्रोलिंग(गस्त), गार्ड, पोस्ट ड्युटी यांसारखी जबाबदारी तो सांभाळणार आहे. धोनीच्या या निर्णयानंतर त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

सर्वसामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सर्वांनी धोनीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. धोनीच्या या कृत्याच्या प्रेमात वेस्ट इंडिज संघातील ‘आर्मीमॅन’ म्हणून ओळखला जाणारा शेल्डन कॉटरेल (Sheldon Cotterell) पडला आहे. धोनीचं देशाच्या सैन्यासाठी प्रेमपाहून शेल्डन प्रभावित झाला आहे. शेल्डनने ट्विट करत आपलं धोनीवर कौतुकांचा वर्षाव केला आहे. धोनीचा एक व्हिडीओही त्यानं पोस्ट केला आहे.

शेल्डनने काय म्हटलेय ट्विटमध्ये –

पहिलं ट्विट –
हा माणूस (धोनी) क्रिकेटच्या मैदानात एक प्रेरणास्थान आहे. शिवाय तो एक देशभक्त असून कर्तव्यदक्ष आहे. सध्या तो आपलं कर्तव्य पार पाडत आहे.

दुसरं ट्विट –
हा व्हिडिओ माझ्या मित्र आणि कुटुंबासोबत शेअर केला आहे कारण त्यांना माहित आहे मला सन्मानाबद्दल कसे वाटते. पण पती आणि पत्नी यांच्यातील तो एक क्षण देशासाठी आणि आपल्या भागीदारासाठी प्रेरणादायक प्रेमाचे वास्तव दर्शवतो. तुम्ही देखील याचा आनंद लुटा जसा मी घेतला आहे.

इंग्लंडमध्ये झालेल्या यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत कॉटरेलचे बळी घेतल्यानंतर सॅल्यूट करून सेलेब्रेशन करत होता. त्याचं हे हटके सेलिब्रेशन चांगलेच गाजले होते. विशेष म्हणजे, कॉटरेल हा स्वतः वेस्ट इंडिजच्या सैन्यदलाचा भाग आहे. सैन्याच्या समर्थनार्थ आपण सॅल्यूट ठोकत असल्याचे त्याने स्पष्ट केले. एका देशाच्या सैन्य जवानांकडून दुसऱ्या जवानाचे कौतुक केले गेले आहे.