27 November 2020

News Flash

Video : ढल गया दिन, हो गई शाम ! टीम इंडियाच्या ‘गब्बर’चा फिल्मी अंदाज पाहिलात का??

फेसबूकवर पोस्ट केला व्हिडीओ

देशभरात सध्या करोना विषाणूमुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले आहेत. या काळात देशातील सर्व महत्वाच्या क्रीडा स्पर्धा अनिश्चीत काळासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. भारतीय क्रिकेटपटूही या काळात आपल्या घरात राहून परिवारासोबत वेळ घालवत आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय झालेला आहे.

शिखर धवनने आपल्या पत्नीसोबत ढल गया दिन, हो गई शाम या गाण्यावर फिल्मी अंदाजात डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्याच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगली पसंतीही दिली आहे.

याआधीही शिखर धवनने आपल्या मुलांसोबत पिलो फाईट करताना, घरात कपडे धुतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. अनेक क्रिकेटपटू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2020 2:45 pm

Web Title: shikhar dhawan posted a video with his wife dancing on bollywood song psd 91
टॅग Shikhar Dhawan
Next Stories
1 विराट म्हणतो ‘या’ फलंदाजांसोबत खेळताना मजा येते !
2 पंतप्रधान मोदींची विराट, सचिन, रोहित, गांगुलीसह ४० क्रीडापटूंसोबत बैठक
3 Video : ६ चेंडूत १९ धावांची गरज अन् ब्रेथवेटचे ४ चेंडूत ४ षटकार… आठवतंय का?
Just Now!
X