News Flash

Video : टीम इंडियाच्या ‘गब्बर’ चा रोमँटीक अंदाज पाहिलात का??

सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडीओ

करोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलं आहे. या परिस्थितीचा फटका देशातील क्रीडा विश्वालाही बसला आहे. बीसीसीआयने आपल्या सर्व महत्वाच्या स्पर्धा व आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. भारतीय खेळाडू लॉकडाउन काळात घरी राहून परिवारासोबत वेळ घालवत आहेत. भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवननेही आपल्या बायकोसोबत बॉलिवूडच्या रोमँटीक गाण्यावर डान्स करताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

लॉकडाउन काळात शिखर धवन सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय झालेला आहे. आपल्या सहकाऱ्यांसोबत गप्पा मारण्यासोबत शिखर आपल्या परिवारासोबतही विविध व्हिडीओ बनवत असतो. मुलांसोबत पिलो फाईट, घरात लादी पुसताना, भांडी घासताना, मुलासोबत क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ धवनने सोशल मीडियावर टाकला होता. ज्याला नेटकऱ्यांनीही चांगला प्रतिसाद दिला. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत भारतात क्रिकेट खेळवणं शक्य नसल्याचं बीसीसीआयने याआधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू पुन्हा मैदानात कधी उतरतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2020 2:43 pm

Web Title: shikhar dhawan posted a video with his wife on old bollywood music psd 91
Next Stories
1 रोहित पवारांनी केली आईच्या आवडीची गोष्ट; म्हणाले…
2 लढा करोनाशी; जगातील अव्वल १० दानशूरांमध्ये एक भारतीय
3 जेव्हा महाराष्ट्र पोलीस आईच्या भूमिकेत शिरतात…
Just Now!
X