News Flash

IPL 2019 : मुंबईच्या विजयानंतर अंबानींच्या सुनेचा डान्स

श्लोकाने डान्स करत हा आनंद साजरा केला आणि त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

श्लोका मेहता

अखेरच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघावर एका धावेने मात करून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सामन्यानंतर मुंबई इंडियन्सने जल्लोष केला. विजयाचा आनंद अंबानींची सून श्लोका मेहताच्या चेहऱ्यावरही पाहायला मिळत होतं. श्लोकाने डान्स करत हा आनंद साजरा केला आणि त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या इतिहासात अनोख्या विक्रमाची नोंद केली. यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने २०१३, २०१५, २०१७ मध्ये आयपीएल चषक आपल्या नावे केलं होतं. त्यानंतर आता २०१९ मध्येही मुंबईने बाजी मारली आहे.

जवळपास दोन महिन्यांपूर्वी श्लोकाने आकाश अंबानीशी लग्नगाठ बांधली. मुंबईत धूमधडाक्यात हा लग्नसोहळा पार पडला होता. या लग्नसोहळ्याला बॉलिवूड कलाकारांनीही हजेरी लावली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2019 5:10 pm

Web Title: shloka mehta victory dance after mumbai indians big win against csk ipl 2019
टॅग : IPL 2019
Next Stories
1 Video : ‘हिटमॅन’च्या रॅपवर युवराजचा डान्स, मुंबईच्या विजयानंतर धमाकेदार सेलिब्रेशन
2 IPL 2019: मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर व्हायरल झालेले मीम्स पाहिलेत का?
3 IPL 2019 : नीता अंबानींचा मंत्रजप, सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया
Just Now!
X