News Flash

भारतीय चाहत्यांनी धमकी दिल्यानंतर काश्मीर मुद्द्यावरुन शोएब अख्तरचा यु-टर्न, म्हणाला…

ईदच्या दिवशी शोएबने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर भारतीय चाहत्यांनी संताप व्यक्त केला होता

शोएब अख्तरचा यु-टर्न

कलम ३७० रद्द करण्यावरुन संताप व्यक्त करणारा पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने जम्मू काश्मीरसंदर्भात सूर बदलल्याचे चित्र दिसत आहे. भारताने कलम ३७० रद्द केल्यानंतर अख्तरने ट्विटवरुन संताप व्यक्त केला होता. मात्र आता या विषयावर तो मवाळ भूमिका घेताना दिसत आहे. अख्तरने युट्यूबवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून काश्मीर विषयावर चिथावणीखोर वक्तव्ये करु नका असं आपल्या चाहत्यांना सांगितलं आहे. काश्मीरबद्दल टीका केल्यानंतर भारतीय नेटकऱ्यांनी अख्तरचे युट्यूब चॅनेल अनसबस्क्राइब करण्याची मोहिम सुरु केल्याने अख्तरला हे शहाणपण आल्याची चर्चा भारतीय नेटकऱ्यांमध्ये सुरु आहे.

अख्तरने युट्यूबवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणतो, “मला मान्य आहे की सध्या परिस्थिती तणावपूर्ण आहे. तसेच मला हेही मान्य आहे की तुमचं तुमच्या देशावर भरपूर प्रेम आहे. मात्र आपले देशप्रेम द्वेषाचं कारण बनू नये. परिस्थिती आणखीन तणावपूर्ण होईल असे कोणतेही विधान काश्मीरसंदर्भात आपल्याकडून होता कामा नये,” असे अख्तरने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

आधी काय म्हणाला होता

ईदच्या शुभेच्छा देताना अख्तरने काश्मीर मुद्द्यासंदर्भात एका लहान मुलाचा फोटो अख्तरने ट्विट केला होता. त्या मुलाच्या डोळ्याला जखम झाल्याने डोळा पट्टीने बांधल्याचा दाखवण्यात आले होते. या फोटोला शोएबने दिलेल्या कॅप्शनमध्ये त्याने “आम्ही तुमच्या बाजूने उभे आहोत. ईद मुबारक.” याशिवाय शोएबने पोस्ट केलेल्या फोटोवरही मजकूर लिहिण्यात आला होता. ‘बलिदान म्हणजे काय हे तुम्हाला पाहून समजते. आम्ही तुमच्या स्वातंत्र्यासाठी प्रार्थना करतो. याच स्वातंत्र्यासाठी आपण जगत असतो,’ अशा अर्थाचा मजकूर या फोटोवर लिहीलेला होता. हा फोटो पोस्ट करताना शोएबने #Kashmir हा हॅशटॅगही वापरला होता.

कुठून आले शहाणपण

शोएबने ईदनिमित्त केलेल्या या ट्विटवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. अनेक भारतीयांना शोएबचे यु ट्यूब चॅनल अनसबस्क्राइब करत असल्याच म्हटले होते.

शोएब अख्तरच्या युट्यूब चॅनेलला १५ लाख ३१ हजार सबस्क्रायबर आहेत. त्यापैकी बहुतांश सबस्क्रायबर भारतीय आहेत. त्यामुळेच आपल्या चॅनेलवर भारतीय नेटकरी बहिष्कार टाकतील या भितीने शोएबने हा यु-टर्न घेतल्याची चर्चा भारतीय नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 11:49 am

Web Title: shoaib akhtar takes u turn on jammu kashmir article 370 scsg 91
Next Stories
1 Video : लाडक्या शिक्षकाची बदली होताच विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रुंचा पूर
2 बाप रे : 280 किमी प्रति तास, सायकलिंगच्या वेगाचा नवा विक्रम
3 Photos : अनुष्काच्या बिकिनीतल्या ‘हॉट’ फोटोवर ‘कूल’ मीम्स व्हायरल
Just Now!
X