अंगावर शहारा आणणा-या एका घटनेत अवघ्या 10 महिन्यांचं बाळ पांढ-या रंगाच्या धावत्या व्हॅनमधून वर्दळीच्या रस्त्यावर पडतं. त्याहून धक्कादायक म्हणजे व्हॅनमध्येच असलेल्या बाळाच्या आई-वडिलांना आपलं बाळ पडलंय हे लक्षातच येत नाही. चीनमधील जिआंग्सू प्रांतातील चॅंगझू शहरात घडलेली ही धक्कादायक घटना कॅमे-यात कैद झाली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

चॅंगझू शहरातील एका रस्त्यावर वळण घेताना पांढ-या रंगाच्या व्हॅनच्या मागील सीटवरून 10 महिन्याचं बाळ खाली पडतं. आपलं बाळ पडलंय याची कल्पनाही आई-वडिलांना नसते त्यामुळे गाडी पुढे निघून जाते. मात्र, रस्त्याने जाणा-या इतर लोकांच्या घडलेला प्रकार लक्षात येतो आणि ते त्या बाळाला उचलतात. थोड्यावेळाने आई-वडिलांच्या घडलेला प्रकार लक्षात येतो आणि ते बाळाला घेऊन जातात. धावत्या गाडीतून पडूनही या बाळाच्या शरीरावर एकही जखम झाली नव्हती, पण त्याला रुग्णालायत निगराणीखाली ठेवण्यात आलं होतं.

पाहा व्हिडीओ –