24 November 2020

News Flash

SHOCKING! झोपलेल्या महिलेच्या तोंडात शिरला साप, डॉक्टरांकडे गेली तर ….

व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही

घरात, छतावर, झाडावार, वाहनात किंवा डोक्यावर तुम्ही अनेकदा साप पाहिला असेल. पण कोणाच्या तोंडात साप गेल्या तुम्ही कधी ऐकलत का? वाचून विचित्र वाटलं ना? पण हे खरं आहे. रशियातील एका मुलीच्या तोंडात चक्क चार फूटी साप गेला होता. तोंडात साप गेल्याचं त्या मुलाला माहितीही झालं नाही… डॉक्टरांनी ऑपरेशन केल्यानंतर मृत अवस्थेतील साप बाहेर निघाला. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार , हा व्हिडीओ रशियाच्या दागेस्तान भागातील लेवशी गावामधील आहे. एक महिला झोपली असता अचानक तिच्या शरिरात ४ फुटी साप गेला. शरिरात प्रवेश केल्यानंतर गुदमरल्यामुळे सापाचा मृत्यू झाला पण तो गळ्यात अडकला. महिलेला गळ्यात काहीतरी आडकल्याचं समजल्यानंतर तिने रुग्णालयाचा रस्ता धरला.  ती महिला घाबरत घाबरत रुग्णालयात पोहचली. डॉक्टरांना भेटल्यानंतर तिने शरीरात काही तरी विचित्र घडत असल्याचं सांगितलं. त्यानंतर डॉक्टरांनी तिची तपासणी केली. ऑपरेशन करुन शरिरातून चार फूट लांब साप बाहेर काढला. डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यापूर्वी या महिलेला भूलीचे इंजेक्शन दिले होते. ऑपरेशन सुरू असताना महिलेच्या शरीरात काय आहे, हे डॉक्टरांनाही माहित नव्हते. मात्र त्यांनी सापाला पाहिल्यानंतर तेही हैराण झाले.

रुग्णालयातील या विचित्र ऑपरेशनचे फुटेजही दागेस्तानच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2020 4:44 pm

Web Title: shocking snake crawls into sleeping russian womans mouth horrifying video shows doctors pulling out the 4 ft long serpent from her throat nck 90
Next Stories
1 ट्विटरच्या इतिहासात सर्वाधिक Like! चॅडविक बोसमन यांच्या अखेरच्या ट्विटने केली कमाल
2 Viral Video : बाप्पाची आरती ऐकून मांजर वाजवू लागली टाळ्या…
3 VIDEO : बाबरने षटकार लगावण्यासाठी मारला फटका अन्…
Just Now!
X