News Flash

थरारक! म्हशीला बैलगाडीला बांधून रस्त्यावर पळवत असतानाच घडलं असं काही….

म्हशीला बैलगाडीला बांधून रस्त्यावर पळवत तरुणांची हुल्लडबाजी

ट्विटरवर एक धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत काही तरुण म्हशीला बैलगाडीला बांधून रस्त्यावर पळवत असताना दिसत आहे. रस्त्यावर अत्यंत वेगाने ते म्हशीला गाडीला बांधून पळवत आहेत. मात्र यावेळी म्हशीने तरुणांना चांगलाच धडा शिकवला आहे. म्हशीने असं काही केलं या तरुणांना जन्माची अद्दल घडली आहे आणि पुन्हा असं कृत्य करताना ते हजार वेळा विचार करतील.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओला ३६ हजाराहून अधिक लोकांनी लाईक केला असून १२ हजार ९०० जणांनी रिट्विट केलं आहे.

व्हिडीओत पाच लोक म्हशीला बैलगाडीला बांधून रस्त्यावर तुफान वेगाने पळवत असल्याचं दिसत आहे. म्हशीने जोरात पळावं यासाठी त्यांची हुल्लडबाजीही सुरु होती. यावेळी रस्त्यावरुन इतर वाहनेही धावत होती. काही वेळाने म्हैस रस्ता सोडून पलीकडच्या बाजूला धावते आणि बैलगाडीचं एक चाक दुभाजकावर आदळतं. बैलगाडी प्रचंड वेगात असल्याने तरुण अक्षरश: हवेत फेकले जातात.

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तरुणांना लगेचच कर्माचं फळ मिळालं असल्याची प्रतिक्रिया देत योग्य झाल्याचं म्हटलं आहे. हा अत्यंत अमानवी प्रकार असल्याचं म्हणत अनेकांनी संतापही व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2020 3:51 pm

Web Title: shocking video of a group of people racing on a buffalo cart sgy 87
Next Stories
1 सोशल मीडियावर सर्वांची मनं जिंकणारे हे चिमुरडे आहेत तरी कोण?? जाणून घ्या…
2 माणुसकी हाच धर्म! हिंदू गर्भवती महिलेला रक्तदान करण्यासाठी मुस्लिम व्यक्तीने तोडला रोजा
3 प्रेयसीच्या भेटीसाठी अधीर झाला, मध्यरात्री पंजाबी ड्रेस घालून घराबाहेर पडला आणि…
Just Now!
X