19 February 2020

News Flash

श्रेया घोषाल सिंगापूर एअरलाइन्सवर भडकते तेव्हा…

श्रेया घोषाल सिंगापूर एअरलाइनवर प्रचंड भडकली असून तिनं ट्विटरच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला आहे

तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेली गायिका श्रेया घोषाल सिंगापूर एअरलाइन्सवर प्रचंड भडकली असून तिनं ट्विटरच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला आहे. विमानामध्ये तिला तिच्यासोबत वाद्य नेण्यास परवानगी नाकारण्यात आल्यानं श्रेया चिडली. अत्यंत कठोर शब्दांमध्ये सिंगापूर एअरलाइन्सचा समाचार घेताना श्रेयानं लिहिलं की, “संगीतकार किंवा अत्यंत मौल्यवान वाद्य असलेलं कुणीही आपल्या विमानात येऊ नये असं सिंगापूर एअरलाइनला वाटतंय बहुतेक. हरकत नाही. धन्यवाद. मी धडा शिकलेय.”

विमानकंपनीनं श्रेयाकडे ट्विटरच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त केली आणि प्रत्युत्तर दिलं की, “श्रेया, घडल्या प्रकाराबद्दल क्षमस्व. आम्हाला सगळ्या घटनेची सविस्तर माहिती दे. आमच्या कर्मचाऱ्यांनी दिलेला शेवटचा सल्ला काय होता हे ही सांग. धन्यवाद.”

एरवी कुणाच्या अध्यात वा मध्यात नसलेल्या श्रेयाच्या भडकण्यामुळे तिचे चाहतेही अचंबित झाले व एकानं तर म्हटलंदेखील की तितकं गंभीर प्रकरण असल्याखेरीज श्रेया ट्विटरवर तक्रार करणार नाही. सिंगापूर एअरलाईन जगातल्या सर्वोत्कृष्ट विमानकंपनीपैकी एक असून त्यांच्याकडून गैरवर्तणुकीची अपेक्षा नाही. परंतु चुकीचं घडलं नसेल तर श्रेया तक्रार करणार नाही असंही चाहत्यांनी म्हटलं आहे.

श्रेयाला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला आहे. याआधी कपिल शर्मासोबत ट्विटरच्या माध्यमातून श्रेयाचा मजेशीर वाद-विवाद घडला होता, ज्यावेळी ती एकदा चर्चेत आली होती. माझ्या चाहत्यांच्या वतीनं बोलावल्याबद्दल धन्यवाद व जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुमच्या शोमध्ये येईन असं कपिल शर्माला श्रेयानं सांगितलं होतं. त्यावर कपिलनं आम्ही चार वर्ष वाट बघत आहोत, पण जेव्हा तुला शक्य होईल तेव्हा ये असं कपिल उत्तरला होता.

First Published on May 16, 2019 1:03 pm

Web Title: shreya ghoshal blasts at singapore airlines
Next Stories
1 “तुला रस्त्यांमध्ये यश प्राप्त होऊ दे”, आनंद महिंद्रांचे जावा ग्राहकासाठी अनोखे बोल
2 रंगिल्या जोडप्याचा टेस्ला कारनामा
3 वडील नमाज पठण करत असताना मुलगी पाठीवर चढून खेळू लागली, गोंडस व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X