25 February 2021

News Flash

नेटकरी म्हणतायत, “श्वेता माईक बंद करो” ; काय आहे हे उघड गुपित?

श्वेताचे गॉसिप होतायत तुफान व्हायरल

गेल्या आठवड्यात यशराज मुखातेचं ‘पावरी हो रही है’ हे गाणं तुफान व्हायरल झालं होतं. सोशल मिडीयावर त्याचे मीम्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत होते. ‘यशराज फिव्हर’ कमी होतो न होतो तोच श्वेता हा एक नवा विषय ट्रेडिंग होत आहे. काय आहे हा ट्रेंड..चला जाणून घेऊया.

सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे. यात एक ऑनलाइन मीटींग चालू असल्याचं दिसतंय. या मिटींगमध्ये १००-११० च्या आसपास लोकं सहभागी आहेत. त्यापैकी श्वेता नावाची एक मुलगी आपल्या राधिका नावाच्या मैत्रिणीशी बोलतेय. त्या दोघी गॉसिप करत आहेत आणि श्वेताचा माईक सुरु असल्यानं मिटींगमधल्या सगळ्यांनाच ती काय बोलतेय हे कळतंय. ग्रृपमधला प्रत्येकजण तिचा माईक ऑन असल्याचं सांगतोय पण तिला ते लक्षात येत नाहीये आणि विशेष म्हणजे श्वेता नावाच्या मुलीला तिच्या एका मित्राने त्याचं टॉप सीक्रेट सांगितलं आणि हे सीक्रेट श्वेता राधिकाला आणि माईक ऑन राहिल्यानं मीटींगमधल्या इतरांनाही सांगत होती.

नेटकऱ्यांच्या तावडीतून हे सुटेलच कसं? इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्वीटर जिकडे बघावं तिकडे या श्वेतावर मीम्स व्हायरल होत आहेत. एवढंच काय, एलॉन मस्कला सुद्धा नेटकऱ्यांनी या ट्रेंडमध्ये सामील करून घेतलंय. एलॉन मस्कच्या ट्विटच्या टेम्प्लेटमधलं ‘श्वेतावर विश्वास ठेऊ नका’ असं सांगणारं मीम व्हायरल होतंय, अशाच पद्धतीनं नरेंद्र मोदी आणि ज्यो बायडेन हेही श्वेताला माईक बंद करायला सांगतायत असं मीमही मीमर्सनी तयार केलंय. ट्वीटरवर तर #shweta ट्रेंडिंगवर आहे. नेटकऱ्यांनी एखादा विषय धरला की ते त्याचा फडशा पाडल्याशिवाय राहत नाहीत हे मात्र नक्की!

पण हा व्हिडिओ अगदी क्लायमॅक्सलाच संपलाय. त्यामुळं त्याच्यापुढे काय? ही चिंता नेटकऱ्यांना चांगलीच सतावतेय. पण हे सुद्धा लवकरच बाहेर येईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही. तोपर्यंत फक्त या ट्रेंडची पुरेपूर मजा घ्यायची.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2021 7:06 pm

Web Title: shweta turn off the mic viral video trending on twitter vk98
Next Stories
1 “वाऱ्याची झुळूक शरीरात गेल्याने गरोदर झाले”, महिलेच्या अजब दाव्यानंतर पोलिसांनी सुरु केला तपास
2 १११ जणांचा कॉल अन् श्वेताने सांगितलेली सेक्स स्टोरी; जाणून घ्या हे Shweta Meme प्रकरण आहे तरी काय?
3 Viral Video: …आणि घोडा नवरदेवालाच घेऊन पळाला, वाचा नेमकं काय घडलं?
Just Now!
X