फक्त भारतातच नाही तर  संपूर्ण जगभरात दिवाळी आनंदात साजरी केली जात आहे. नोकरीनिमित्त परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांनी आपली संस्कृती जपली आहे, भारतीय सणांबद्दल नेहमीच परदेशात आकर्षण राहिलं आहे. कॅनडा, अमेरिकेपाठोपाठ सिंगापूरमध्येही मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीनिमित्त गेल्यावर्षी सिंगापूरमध्ये खास दिवाळी ट्रेन सुरू करण्यात आली होती. या संकल्पनेला सिंगापूरमधल्या भारतीयांकडून तसेच जगभरातून मिळालेल्या तुफान प्रतिसादामुळे पुन्हा एकदा दिवाळी स्पेशल ट्रेन आणि बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.

पक्ष्यांना त्रास होऊ नये म्हणून ‘या’ गावांत फटाके फोडतच नाही!

Video : सचिनने चाहत्यांना दिलेला संदेश तुम्हीही ऐकलाच पाहिजे!

या ट्रेन आणि बसमध्ये ठिकठिकाणी रांगोळ्या, दिवे, तोरण, शुभ शकुनांचे स्टिकर्स चिटकवण्यात आले आहे. सिंगापूरमधल्या रस्ते वाहतूक विभागाने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर सजवलेल्या ट्रेनचे आणि बसचे फोटोदेखील शेअर केले आहेत. ट्रेनच्या कोचमध्ये दिवाळीचा शुभेच्छा देणारे संदेश देखील लावण्यात आले आहेत. दिवाळी ट्रेनची कल्पना सिंगापूरमधल्या ‘छोटा भारत’ (‘लिटल इंडिया’) ठिकाणावरून सुचली. सिंगापूरमधल्या छोटा भारत म्हणजेच लिटल इंडियात भारतीयांची संख्या जास्त आहे. त्यामुळे येथे दिवाळी मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते. हा परिसर विविध प्रकारच्या रोषणाईने, कंदिलांनी सजवला जातो.

दिवाळी स्पेशल बस आणि ट्रेनची सेवा ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. सिंगापूरमधल्या भारतीयांना कसलीच कमतरता भासू नये तसेच तिथल्या स्थानिकांना भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्याच्या एमआरटीच्या प्रयत्नांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.