अमेरिकेच्या न्यू मेक्सिकोमध्ये रविवारी इतिहासामध्ये नोंद होईल अशी कामगिरी करण्यात आली आहे. ब्रिटीश अब्जाधीश आणि व्हर्जिन समूहाचे संस्थापक रिचर्ड ब्रॅन्सन आणि पाच सहकाऱ्यांसह व्हर्जिन गॅलॅक्टिक व्हीएसएस युनिटी विमान अंतराळात जाऊन पुन्हा सुरक्षितपणे पृथ्वीवर आले आहे. भारतीय वेळेनुसार रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्यांचे विमान न्यू मेक्सिकोमधील लाँचिंग सेंटर स्पेसपोर्टवर परत आले.

रिचर्ड ब्रॅन्सन यांनी लहानपणी पाहिलेले स्वप्न वयाच्या ७१व्या वर्षी पूर्ण झाले आहे. जेव्हा रिचर्ड ब्रॅन्सन यांनी आपले स्वप्न पूर्ण केले, तेव्हा “जादुई” प्रवासात पाच लोकांमध्ये भारताच्या आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील एका महिलेचा समावेश होता. भारतीय वंशाच्या अ‍ॅरोनॉटिकल इंजिनिअर सिरीषा बंडला यांचा त्यामध्ये समावेश होता.

What is space tourism Gopi Thotakura to be the first Indian space tourist
भारतीय व्यक्ती पहिल्यांदाच करणार अंतराळ पर्यटन; काय आहेत त्यामधील आव्हाने?
Mahindra XUV 3X0 bookings open
महिंद्राच्या नव्या SUV कारला देशातील बाजारपेठेत दाखल होण्यापूर्वीच मोठी मागणी; बुकींग सुरु, पाहा किती मोजावे लागणार पैसे
chipko movement, chipko movement lokrang article
चिपको : हिमालयापासून केरळपर्यंत…
trees Thane-Belapur industrial city
हरित पट्ट्याच्या मुळावर एमआयडीसी, २०० झाडांची कत्तल होणार, पर्यावरणवादी संस्थेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

ब्रॅन्सन यांच्या सफरीमुळे सिरीषा बंडला या अंतराळात जाणाऱ्या तिसऱ्या भारतीय महिला बनल्या आहेत. याआधी नासातर्फे कल्पना चावला आणि सुनीता विलियम्स या भारतीय वंशाच्या महिला अंतराळात गेल्या होत्या. सिरीषाने २०११ मध्ये परड्यू युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ अ‍ॅरोनॉटिक्समधून विज्ञान विषयात पदवी घेतल्यावर जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातून एमबीएची पदवी सन २०१५ मध्ये मिळविली.

“अगदी लहान वयातच तिला आकाश, चंद्र आणि तारे शोधण्याची महत्वाकांक्षा होती. सिरीषाने अवकाशात जाण्याचा निश्चय केला होता आणि मला आश्चर्य याचे वाटले नाही की ती आपले स्वप्न साकार करण्यासाठी तयार आहे,” असे सिरिषाचे आजोबा डॉ. बंडला नागाय्या यांनी रविवारी उड्डाण होण्यापूर्वी इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

अब्जाधीश रिचर्ड ब्रॅन्सन पोहोचले थेट अंतराळात; फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल

“ती अवकाशात जाणाऱ्या समूहाचा भाग असल्याचे वृत्त समजल्यानंतर मी तिला फोन केला. ती गाडी चालवत होती पण तरीही तिने उत्तर दिले. जेव्हा मी तिचे अभिनंदन केले, तेव्हा ती होय, शेवटी हे घडत आहे, आणि ती म्हणाली, धन्यवाद था (आजोबा), असे डॉ.नागाय म्हणाले.

गेल्या नोव्हेंबरमध्ये ती गुंटूरला आली होती आणि नेहमीप्रमाणे ती ऊर्जा आणि कल्पनांनी भरलेली होती. गेल्या वेळी ती गेली असताना तिने अंतराळात जाण्याविषयी सांगितले नाही पण ती खूप महत्वाची कामे करत असल्याचे तिने सांगितले. आचार्य एन. जी. रंगा कृषी विद्यापीठातून कृषी शास्त्रज्ञ म्हणून निवृत्त झालेल्या नागाय्या म्हणाले की, ती खूप निर्णायक आहे आणि तिच्यामध्ये नेतृत्व करण्याचे चांगले गुण आहेत.

सिरीषाचा जन्म चिरला येथे तिच्या आजोबांच्या घरी झाला. त्यानंतर हे कुटुंब गुंटूरमधील तेनाली येथे गेले. वयाच्या ५व्या वर्षापर्यंत सिरीषा हैदराबादमध्ये आजीच्या घरी होती. त्यानंतर, ती अमेरिकेत आपल्या पालकांकडे हॉस्टनला गेली. सिरीषाचे आई वडिल अमेरिकन सरकारी कर्मचारी आहेत, सध्या ते भारतात तैनात आहेत. नगाय्या म्हणाले की सिरीषा आणि तिची मोठी बहीण खूप प्रेमळ असून आपल्या आजी आजोबांच्या संपर्कात असते.

बर्‍याच वर्षांपासून ती जवळजवळ दरवर्षी, कधीकधी दोन वेळा भारतात येत असे. ह्यूस्टनमध्ये शिरीशा नासाच्या अंतराळ शोध कामाबद्दल आणि बातम्यांकडे आकर्षित झाली. लहानपणापासूनच तिला एरोनॉटिक्स आणि एरोस्पेसमध्ये रस होता. “जेव्हा ती लहान होती तेव्हा ती विमान, आकाश, अंतराळ प्रवास इत्यादीबद्दल बरेच प्रश्न विचारत असे. आकाश आणि अवकाश याबद्दल तिचे विचार आणि कल्पना लिहित असत असे” नागाय्या म्हणाले.

नऊ दिवसांनी बेझोस जाणार अंतराळात

ब्रेनसननंतर आणखी एक अब्जाधीश जेफ बेझोस देखील २० जुलै रोजी आपली कंपनी ब्लू ओरिजिनच्या न्यू शेफर्डमध्ये अवकाशात जाणार आहेत. बेझोस २० जुलै रोजी पश्चिम टेक्सास येथून प्रक्षेपण करणार आहेत हे, जो चंद्रावर उतरणार्‍या अपोलो ११ चा ५२ वा वर्धापन दिन असेल.

ब्रॅन्सन यांचा तामिळनाडूशी आहे वडिलोपार्जित संबंध

अवकाशात जाणारे पहिले अब्जाधीश बनून इतिहास रचणारे ब्रिटिश उद्योजक रिचर्ड ब्रॅन्सन यांचाही भारताशी संबंध आहे. तामिळनाडूच्या कुडलोरमध्ये ७१ वर्षीय ब्रॅन्सन यांचे पूर्वज होते.

मुंबई आणि पुण्यादरम्यान हायपरलूप नेटवर्क तयार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारशी करार करणार्‍या व्हर्जिन कंपनीचे मालक ब्रॅन्सन यांनी डिसेंबर २०१९ मध्ये डीएनए चाचणीनंतर उघड केले होते की त्यांच्या वडिलांची भारतीय वंशाची आजी अरिया कुडलोर येथील रहिवासी आहे. १७९३ मध्ये त्यांनी लग्न केले आणि ब्रॅन्सन यांच्या कुटुंबात जोडल्या गेल्या. या कारणास्तव ब्रॅन्सन स्वत:ला भारतीय वंशाचा उद्योजक मानतात. ब्रॅन्सन यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक वेळी जेव्हा मी एखाद्या भारतीयांना भेटतो, तेव्हा मी म्हणतो की आपण नातेवाईक असू शकतो.

व्हर्जिन गॅलॅक्टिक युनिटी २२ अंतराळयानानं रविवारी रात्री यशस्वी अंतराळ उड्डाण पूर्ण करून इतिहास रचला आहे. अंतराच्या या अविस्मरणीय प्रवासामुळे खासगी अंतराळ पर्यटनाचा मार्ग खुला होणार आहे. आता सामान्य पर्यटकही अंतराळ प्रवास करुन येऊ शकतो.